माळढोकचे राखीव क्षेत्र कमी करा बबनराव पाचपुते : पर्यावरण मंत्र्यांना निवेदन

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:03+5:302015-02-14T23:51:03+5:30

अहमदनगर : जिल्‘ातील शेतकर्‍यांच्या जमिनीवर माळढोक पक्षी अभयारण्य म्हणून ठेवण्यात आलेले खासगी जमिनीवरील राखीव क्षेत्र कमी करावे, अशी मागणी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे.

Banubaraw Pachpute: Demand for Environmental Ministers | माळढोकचे राखीव क्षेत्र कमी करा बबनराव पाचपुते : पर्यावरण मंत्र्यांना निवेदन

माळढोकचे राखीव क्षेत्र कमी करा बबनराव पाचपुते : पर्यावरण मंत्र्यांना निवेदन

मदनगर : जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या जमिनीवर माळढोक पक्षी अभयारण्य म्हणून ठेवण्यात आलेले खासगी जमिनीवरील राखीव क्षेत्र कमी करावे, अशी मागणी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे.
शासकीय विश्रामगृहावरील आयोजित बैठकीनंतर पाचपुते यांनी मंत्री जावडेकर यांची भेट घेऊन माळढोक अभयारण्य क्षेत्राबाबत चर्चा केली. या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमधील शेतकर्‍यांच्या जमिनीवर माळढोक पक्षी अभयारण्य म्हणून खासगी क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. वास्तविक माळढोक भागात वावर आढळून येत नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या मागणीवरून खासगी क्षेत्र कमी करण्याबाबतची कार्यवाही शासन स्तरावर अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नगर विकास विभागामार्फत अनेक परवानग्या मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत पूर्वीच्या आणि आताच्याही सरकारकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. मात्र त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. याबाबत अंतिम अधिसूचना काढून शेतकर्‍यांना न्याय द्यावा. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक, नंदकुमार कोकाटे आदी उपस्थित होते.

Web Title: Banubaraw Pachpute: Demand for Environmental Ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.