रेल्वे लाचप्रकरणी बन्सल यांची सोमवारी साक्ष
By Admin | Updated: September 17, 2014 01:20 IST2014-09-17T01:20:38+5:302014-09-17T01:20:38+5:30
माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांना विशेष न्यायालयाने 22 सप्टेंबर रोजी साक्षीसाठी हजर होण्याचा आदेश दिला आहे.

रेल्वे लाचप्रकरणी बन्सल यांची सोमवारी साक्ष
नवी दिल्ली : माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांना विशेष न्यायालयाने 22 सप्टेंबर रोजी साक्षीसाठी हजर होण्याचा आदेश दिला आहे.
- बन्सल मंगळवारी आजारी असल्यामुळे गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांना नव्याने समन्स जारी करण्यात आले आहे. रेल्वेत मंडळावर नियुक्तीसाठी 1क् कोटी रुपयांची लाच देण्यात आल्याप्रकरणी बन्सल यांना साक्षीदार बनविण्यात आले आहे.
बन्सल यांना ताप असल्यामुळे मंगळवारी वैयक्तिरीत्या हजर न राहण्याची सवलत देण्यात आली, मात्र पुढील सुनावणीच्यावेळी कोणतेही कारण चालणार नाही, असे सीबीआयचे विशेष न्यायाधीश स्वर्णकांता शर्मा यांनी बजावले. रेल्वे मंडळाचे सदस्यपद मिळविणारे महेश कुमार निलंबित असून त्यांनी बन्सल रेल्वेमंत्री असताना त्यांचा भाचा विजय सिंगला आणि आणि इतरांना 1क् कोटी रुपयांची लाच दिल्याचे उघड झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)