शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

थकबाकीमुळे बँका होणार अस्थिर

By admin | Published: May 10, 2017 12:45 AM

उद्योग क्षेत्रातील कर्जांची थकबाकी वाढल्यामुळे या क्षेत्रातून बँकांना होणारी मिळकत अस्थीर होणार आहे, अशा परिस्थिीत किरकोळ

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उद्योग क्षेत्रातील कर्जांची थकबाकी वाढल्यामुळे या क्षेत्रातून बँकांना होणारी मिळकत अस्थीर होणार आहे, अशा परिस्थिीत किरकोळ आणि गृह क्षेत्रातील कर्ज हेच बँकांसाठी मिळकतीचे उत्त्तम साधन ठरणार आहे. गुंतवणूक बँकिंग संस्था जेफरीजने एका अहवालात ही माहिती दिली आहे.भारतीय बँकांचे उद्योग क्षेत्रातील बुडीत कर्जांचे प्रमाण (एनपीए) अलिकडे प्रचंड वाढले आहे. त्याविरुद्ध केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांनी काही उपाय योजना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या एका अहवालात जेफरीजने ही माहिती दिली आहे. अहवालात म्हटले आहे की, एनपीएच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी सरकार काही कायदेशीर चौकट निश्चित करील, असे दिसते. अडथळे दूर करण्यासाठी नवीन कायदेही केले जाऊ शकतात. अशी पावले उचलणे चांगले असले तरी त्यासाठी नेहमीच खूप वेळ लागत आला आहे. अहवाल म्हणतो की, उद्योग क्षेत्रातील कर्जाची स्थिती लगेच सुधारणार नाही. उद्योग क्षेत्राला कर्ज देणाऱ्या बँकांची मिळकत अस्थीर आणि कमजोरच राहील. अशा परिस्थितीत बँकांसाठी शुद्ध किरकोळ कर्ज आणि गृहकर्ज हे व्यवसायाचे चांगले पर्याय ठरतात.१२ महिन्यांत बँकांचा खर्च वाढणार-५ मे रोजी सरकारने एक आदेश काढून बँकिंग नियमन कायद्यात दोन नवी कलमे घातली आहेत. यापैकी एक असलेल्या ३५एए या कलमान्वये थकबाकीदार उद्योगांवर अप्रत्यक्ष नियंत्रण मिळविण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला मिळाला आहे. याचवेळी दिवाळखोरी कायद्याच्या चौकटीबाहेर समेटासाठी संयुक्त ऋणदाता मंच (जेएलएफ) विषयक नियम रिझर्व्ह बँकेने शिथील केले आहेत. त्यामुळे येत्या १२ महिन्यांत बँकांचा खर्च वाढणार आहे, असे जेफरीजने म्हटले आहे.