शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

अनधिकृत व्यवहारांपासून सुरक्षित ठेवणे, फसवणुकीची रक्कम देणे बँकांची जबाबदारी: कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 12:31 IST

६ जुलै २०१७ च्या आरबीआय परिपत्रकात काय? वाचा सविस्तर

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ग्राहकांना अनधिकृत व्यवहारांपासून सुरक्षित ठेवणे बँकांची  जबाबदारी आहे, असे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने ‘एसबीआय’ला फसव्या व्यवहारांची रक्कम ग्राहकाला परत करण्याचे निर्देश दिले. आसामच्या ज्योती यांचे एसबीआयमध्ये खाते होते. त्यांच्या खात्यात ८ मे ते १७ मे २०१२ दरम्यान ४ लक्ष ४५ हजारांचे अनधिकृत ऑनलाइन व्यवहार झाले. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर त्यांना या व्यवहारांचे कोणतेही ओटीपी किंवा एसएमएस अलर्ट मिळाले नाहीत. त्यांनी हे बँक आणि पोलिसांना कळवले.

ग्राहकांच्या निष्काळजीपणामुळे हे झाले असे एसबीआयने म्हटले. पोलिस तपासात मात्र ठाणे येथून हा सायबर गुन्हा घडल्याचे स्पष्ट झाले. यानंतरही एसबीआयने ज्योती यांचा दावा फेटाळला, म्हणून त्यांनी गुवाहाटी हायकोर्टात याचिका केली.

६ जुलै २०१७ च्या आरबीआय परिपत्रकात काय?

  • ओटीपी शेअर केला नसतानाही झालेल्या अनधिकृत व्यवहाराची तक्रार ग्राहकाने ३ दिवसांच्या आत बँकेकडे केल्यास बँकेला फसव्या व्यवहाराची रक्कम परत करावी लागेल.  
  • बँकेने फसव्या व्यवहारांच्या ग्राहकांच्या तक्रारी ९० दिवसांच्या आत सोडवाव्यात.

बँकांनी सतर्क राहावे

  • ग्राहकाने ओटीपी शेअर केल्यामुळे व्यवहार अधिकृत होता असा दावा हायकोर्टात एसबीआयने केला. मात्र पोलिस तपासात हे व्यवहार फसवे असल्याचे स्पष्ट झाले असून यात ज्योती यांची चूक नसल्याचे म्हणत हायकोर्टाने एसबीआयला ज्योती यांना रक्कम परत करण्याचे आदेश दिले.
  • सुप्रीम कोर्टाने हा निर्णय कायम ठेवला. फसवणूक आणि अनधिकृत व्यवहार रोखण्यासाठी बँकांनी सतर्क राहावे, असे कोर्टाने म्हटले आहे.
टॅग्स :bankबँक