शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी महाकुंभमेळ्यात गेली, नाराज पतीचा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज; काय आहे संपूर्ण प्रकरण?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 15:57 IST

भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात पतीने आपल्या पत्नीच्या धार्मिकतेमुळे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहेत.

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी बरेच भाविक दाखल होत आहेत. मात्र, एका पतीला त्याची पत्नी महाकुंभमेळ्यात गेल्याने इतका संताप आला की त्याने थेट न्यायालयातघटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. दरम्यान, हे एकच प्रकरण नाही तर, पत्नीची अध्यात्माकडे जास्त ओढ असल्याचे कारण देत घटस्फोटासाठी अशी तीन प्रकरणे भोपाळ कुटुंब न्यायालयात पोहोचली आहेत.

भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात पतीने आपल्या पत्नीच्या धार्मिकतेमुळे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. गेल्या एका महिन्यात अशी तीन प्रकरण समोर आली आहेत. या प्रकरणांमध्ये, पत्नींचा धर्माकडे वाढता कल घटस्फोटाचे कारण बनत आहे. एका प्रकरणात बँक अधिकाऱ्याने आपल्या पत्नीच्या महाकुंभाला जाण्यावर नाराजी व्यक्त केली आणि त्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. 

माझा नकार असतानाही पत्नी आपल्या मित्रांसोबत धार्मिक यात्रांना जाते, असे बँक अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, पत्नी गेल्या महिन्यात वृंदावनहून परतली होती आणि तेव्हापासून तिने सिंदूर आणि बिंदीऐवजी चंदनाचा टिळक लावण्यास सुरुवात केली आहे. यानंतर ती महाकुंभमेळ्यालाही गेली आणि परतल्यानंतर तिने रुद्राक्षाची माळ घालायला सुरुवात केली. पत्नीच्या बदलत्या वागण्यामुळे अस्वस्थ वाटत होते, असेही बँक अधिकाऱ्याने सांगितले. 

नोकरी मिळाली नाही तर पूजा करतेदुसऱ्या एका घटस्फोटातील प्रकरणात, पतीने सांगितले की, पूर्वी त्याची पत्नी स्पर्धा परीक्षांची तयारी करायची, पण नोकरी न मिळाल्याने तिने पूजा पाठ करायला सुरुवात केली. यश मिळाले नाही, पण उपासनेची प्रथा वाढतच गेली. आता, पत्नी धार्मिक गुरूंनी सुचवलेल्या विधी करण्यासाठी मंदिरात तासनतास घालवते आणि घरात त्यांचे व्हिडिओ देखील प्ले करते, ज्यामुळे कुटुंबातील सदस्य अस्वस्थ झाले आहेत.

जोडप्यांना समुपदेशन करण्याचा प्रयत्नवरील दोन्ही प्रकरणांमध्ये आणि आणखी एका प्रकरणात पत्नींची वाढती धार्मिकता घटस्फोटासाठी कारण बनली आहे. अशा प्रकरणांमध्ये, भोपाळ कुटुंब न्यायालयाचे समुपदेशक जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांचे नाते टिकवण्याचे प्रयत्न करत आहेत. समुपदेशनाद्वारे, या जोडप्यांना एकमेकांच्या विचारांचा आणि धार्मिक प्रवृत्तीचा आदर करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.

टॅग्स :Divorceघटस्फोटCourtन्यायालयKumbh Melaकुंभ मेळा