बँक क्लार्ककडून अधिकार्यास जीवे मारण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:33+5:302015-09-07T23:27:33+5:30
भेंडा : येथील बँक ऑफ बडोदा शाखेतील क्लार्कने अंतर्गत वादातून अधिकार्याचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री घडली़ याबाबत कुकाणा पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दाखल करण्यात आली आहे़

बँक क्लार्ककडून अधिकार्यास जीवे मारण्याचा प्रयत्न
भ ंडा : येथील बँक ऑफ बडोदा शाखेतील क्लार्कने अंतर्गत वादातून अधिकार्याचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री घडली़ याबाबत कुकाणा पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दाखल करण्यात आली आहे़येथील बँक ऑफ बडोदा शाखेतील अधिकारी रितेज रंजतकुमार यांनी कुकाणा पोलीस चौकीत दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भेंडा येथे तोताळा याच्या खोलीत मी भाडोत्री राहत आहे़ मी बडोदा बँकेत अधिकारी म्हणून काम पाहतो. बँकेतील क्लार्क अनुपम राजेंद्रप्रसाद कवडे (रा.नागपूर, हल्ली रा़भेंडा) याने शनिवारी (दि़ ५) रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास माझ्या खोलीत येऊन दोरीने माझा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला़ मात्र, मी मोठ्याने आराडाओरड केल्यामुळे अनुपमच्या आईने मला वाचविले़ त्यामुळे अनुपम तेथून पळून गेला़ सोमवारीही तो बँकेत कामावर नसल्याचे पोलिसांनी सांगितले़