बंजारा महोत्सवाचे थाटात उद्घाटन -----------

By Admin | Updated: February 15, 2016 01:59 IST2016-02-15T01:59:35+5:302016-02-15T01:59:35+5:30

पाथर्डी(अहमदनगर): बंजारा समाजाचे आद्य धर्मगुरू संतश्री सेवादास महाराजांच्या २७७ व्या जयंतीनिमित्त गोर-संस्कार २०१६ या राज्यस्तरीय बंजारा महोत्सवाचे रविवारी थाटामाटात उद्घाटन झाले. बंजारा लेंगी गीत, ढालीया नृत्य, सारंगी वादन, कलापथक व भजनाच्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. परिसंवादात समाजातील मान्यवरांनी मार्गदर्शन करीत युवकांना समाजशास्त्राचे धडे दिले.

Banjara Festival inaugurated in ----------- | बंजारा महोत्सवाचे थाटात उद्घाटन -----------

बंजारा महोत्सवाचे थाटात उद्घाटन -----------

थर्डी(अहमदनगर): बंजारा समाजाचे आद्य धर्मगुरू संतश्री सेवादास महाराजांच्या २७७ व्या जयंतीनिमित्त गोर-संस्कार २०१६ या राज्यस्तरीय बंजारा महोत्सवाचे रविवारी थाटामाटात उद्घाटन झाले. बंजारा लेंगी गीत, ढालीया नृत्य, सारंगी वादन, कलापथक व भजनाच्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. परिसंवादात समाजातील मान्यवरांनी मार्गदर्शन करीत युवकांना समाजशास्त्राचे धडे दिले.
शहरातील श्री जगदंबा सेवादास मंदिराच्या प्रांगणात दोन दिवसीय बंजारा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भरत राठोड यांच्या हस्ते झाले. या वेळी झालेल्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा बंजारा सेवादलाचे अध्यक्ष डॉ. आर. आर. राठोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी संजय राठोड, कोपरगावचे गटविकास अधिकारी मोहन जाधव, औरंगाबादचे विक्रीकर आयुक्त अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Banjara Festival inaugurated in -----------