शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

...तर काश्मीरमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांमुळे दहशतवादी हल्ले वाढतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 12:13 IST

भविष्यात हे लोक दहशतवाद्यांचे आश्रयदाते ठरू शकतात.

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या सुंजवा लष्करी तळावर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांना हल्ला केला. या हल्ल्यात दोन भारतीय जवान जखमी झाले असून चार जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर स्थानिक नागरिक आणि भाजपाचे विधानपरिषदेतील आमदार विक्रम रंधवा यांनी वेगळीच भीती व्यक्त केली. गेल्या काही काळापासून जम्मू परिसरात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या वाढत आहे. त्यांना अटकाव न केल्यास भविष्यात हे लोक दहशतवाद्यांचे आश्रयदाते ठरू शकतात. मी हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला आहे. आज सुंजवा लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याशीही याचा संबंध असण्याची शक्यता आहे. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रंधवा यांनी केली. जम्मू-पठाणकोट महामार्गानजीक असणाऱ्या सुंजवा लष्करी तळावर पावणे पाच वाजता हा हल्ला झाला. लष्करी तळाच्या जवळ पहाटेपासून काही संशयास्पद हालचाली जाणवत होत्या. पहाटे पावणे पाचच्या सुमारास सुंजवा लष्करी कॅम्पवर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. यावेळी दहशतवादी जवळच्या रहिवासी इमारतीमध्ये लपून बसले. त्यानंतर भारतीय लष्कराने हा संपूर्ण परिसर खाली करून कारवाईला सुरूवात केली. काही तास दोन्ही दिशेने गोळीबार सुरू होता. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले आहेत. मात्र, दहशतवाद्यांची नेमकी संख्या माहिती नसल्यामुळे सध्या लष्कराकडून ड्रोनद्वारे संबंधित परिसराची पाहणी सुरु आहे. 9 फेब्रुवारी 2013 रोजी अफजल गुरूला फाशी दिल्याला यंदा पाच वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी अशाप्रकारच्या हल्ल्याचा इशारा सुरक्षा दलांना दिला होता. गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. तर दहशतवाद्यांकडून लष्करी तळांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी 5 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी पुलवामाच्या काकापुरा येथील 50व्या राष्ट्रीय रायफल्सच्या छावणीवर हल्ला केला होता. यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार आणि ग्रेनेडस् फेकण्यात आले होते. या हल्ल्यात भारतीय जवानांना कोणतीही इजा झाली नसली तरी दहशतवादी येथून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर