मोदींची 'मन की बात' ऐकणार बांगलादेशी नागरीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 20:30 IST2016-07-01T20:30:12+5:302016-07-01T20:30:12+5:30
महिन्यातून एकदा बांगलादेशमध्ये प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमादरम्यान मोदी इंडो-बांगलादेशदरम्यान मैत्रीपूर्ण संबंधांवर चर्चा करणार आहेत.

मोदींची 'मन की बात' ऐकणार बांगलादेशी नागरीक
>ऑनलाइन लोकमत
कोलकता, दि. १ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे प्रक्षेपण लवकरच बांगलादेशातही केले जाणार आहे. बांगलादेशी रेडिओ चॅनेल स्थानिक भाषेत हा कार्यक्रम प्रसारित करणार आहेत. महिन्यातून एकदा बांगलादेशमध्ये प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमादरम्यान मोदी इंडो-बांगलादेशदरम्यान मैत्रीपूर्ण संबंधांवर चर्चा करणार आहेत. दुसऱ्या देशामध्ये आपली चर्चा पोचविण्यासाठी हे महत्वपूर्ण पाऊल आहे. यापूर्वी असा कोणताही कार्यक्रम झालेला नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
भारत-बांगलादेश या दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असणार आहे. भारतातील ऑल इंडिया रेडिओ ने बांगलादेशमधील आकाशवाणी रेडिओ चॅनेलशी चर्चा केली आहे. मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम बांगलादेशमधील नागरिक स्थानिक भाषेमध्ये ऐकायला मिळणार आहेत. कार्यक्रमादरम्यान नागरिक मोदींना प्रश्नही विचारू शकणार आहेत.