शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
5
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
6
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
7
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
8
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
9
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
10
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
11
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
12
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
13
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
14
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
15
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
16
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
17
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
18
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
19
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
20
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 12:02 IST

Bangladesh Plane Crash: लोकांचा राग पाहता काही वेळानंतर पोस्ट डिलीट करावी लागली.

Bangladesh Plane Crash: बांग्लादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या विमानअपघातानंतर देशाचे प्रमुख मोहम्मद युनूस यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अपघातानंतर युनूस यांनी फेसबुक पोस्टद्वारे देशवासीयांना दान देण्याचे आवाहन केले होते. हे पैसे माइलस्टोन स्कूलवर झालेल्या अपघातातील मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी वापरण्यात येणार होते.

मात्र, मोहम्मद युनूस यांच्या या पोस्टमुळे बांग्लादेशमध्ये राजकीय गोंधळ निर्माण झाला. अपघातातील बळींना मदत करण्यासाठी युनूस सरकारकडे पैसे नसल्यावरुन अनेकांनी टीका केली. हा वाद इतका वाढला की, मोहम्मद युनूस यांना ही फेसबुक पोस्ट ताबडतोब डिलीट करावी लागली.

देणगी मागून युनूस अडकलेमोहम्मद युनूस यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये नागरिकांना "मुख्य सल्लागार मदत आणि कल्याण निधी" मध्ये देणगी देण्याचे आवाहन केले होते. बांग्लादेशी वृत्तपत्र द डेली स्टारमधील एका वृत्तानसार, ही पोस्ट २२ जुलै २०२५ रोजी दुपारी २:०० नंतर टाकण्यात आली होती. ही फेसबुक पोस्ट मोहम्मद युनूस यांचे वरिष्ठ सहाय्यक प्रेस सचिव फयज अहमद यांनी प्रेस विंगच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये देखील शेअर केली होती. 

पोस्ट हटवलीमोहम्मद युनूस यांनी ही फेसबुक पोस्ट पोस्ट करताच नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली. अनेक राजकीय पक्षांसह सामान्य लोकांनी युनूसवर हल्लाबोल केला. या फेसबुक पोस्टवर इतका गोंधळ उडाला की शेवटी कोणतेही कारण न देता ती हटवण्यात आली. अमिन सोनी नावाच्या व्यक्तीने म्हटले की, युनूस यांना आता देश चालवण्यासाठी भीक मागावी लागत आहे. तर, आणखी एका युजरने म्हटले, अशा पोस्टचा अर्थ काय? सरकारकडे पीडितांना मदत करण्यासाठी पुरेसे पैसे नाही का? हा जनतेचा अपमान आहे.

घटनास्थळी प्रचंड निदर्शनेमंगळवारी बांग्लादेशच्या राजधानीत विमान अपघातस्थळी आणि सचिवालय इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी अंतरिम सरकारचे शिक्षण सल्लागार आणि शिक्षण सचिव यांचा तात्काळ राजीनामा मागितला. ढाका ट्रिब्यून वृत्तपत्रानुसार, घटनास्थळी पोहोचलेल्या सरकारच्या कायदा आणि शिक्षण सल्लागारांना आणि युनूसच्या प्रेस सचिवांना विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगने या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशPlane Crashविमान दुर्घटनाairplaneविमानAccidentअपघात