बंगाली पत्रकारांनी चोरले लंडनच्या हॉटेलातील चमचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:33 IST2018-01-11T00:33:25+5:302018-01-11T00:33:34+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यासह लंडनला गेलेल्या ज्येष्ठ पत्रकारांनी तेथील आलिशान हॉटेलातील चांदीचे चमचे, काटे व सुरे चोरल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेºयाने हे सारे टिपल्याने त्या पत्रकारांना चोरलेल्या वस्तू व ५0 पौंड दंड भरून स्वत:ची सुटका करून घ्यावी लागली.

बंगाली पत्रकारांनी चोरले लंडनच्या हॉटेलातील चमचे
कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यासह लंडनला गेलेल्या ज्येष्ठ पत्रकारांनी तेथील आलिशान हॉटेलातील चांदीचे चमचे, काटे व सुरे चोरल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेºयाने हे सारे टिपल्याने त्या पत्रकारांना चोरलेल्या वस्तू व ५0 पौंड दंड भरून स्वत:ची सुटका करून घ्यावी लागली.
ममता यांच्या सन्मानार्थ लंडनमधील हॉटेलात मेजवानी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी चांदीचे चमचे, काटे या पत्रकारांनी खिशात घातले. मात्र त्यांची प्रत्येक हालाचाल सीसीटीव्ही कॅमेºयात टिपली जात होती. त्यांचे हे चौर्यकर्म पाहून या हॉटेलातील सुरक्षा रक्षकही चक्रावले. पत्रकारांना चौर्यकर्माचा दृश्य पुरावा दाखविल्यानंतर त्यांचे चेहरे पडले. एक वगळता इतर सर्वांनी चोरलेल्या वस्तू परत केल्या.
एका पत्रकाराने मात्र आपण चोरी केलीच नाही, असा दावा
केला. तथापि, सीसीटीव्ही कॅमेºयातील दृश्य पाहून, त्यालाही दंड भरावा लागला. दौºयावर गेलेले सर्व वरिष्ठ संपादक आहेत. बंगाली भाषेतील एका वृत्तपत्रात काम करणाºया पत्रकाराने सर्वप्रथम चमचे चोरले. त्याचा कित्ता इतरांनी गिरवला. (वृत्तसंस्था)