बंगळुरू वर्ल्ड रेकॉर्ड

By Admin | Updated: October 3, 2015 00:20 IST2015-10-03T00:20:30+5:302015-10-03T00:20:30+5:30

गांधीजींच्या पोशाखातील

Bangalore World Records | बंगळुरू वर्ल्ड रेकॉर्ड

बंगळुरू वर्ल्ड रेकॉर्ड

ंधीजींच्या पोशाखातील
विद्यार्थ्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड
.............
बंगळुरू : स्टेडियमवर अवतरले ४६०० विद्यार्थी
......
बंगळुरू : महात्मा गांधीजींच्या पोशाखातील ४६०० विद्यार्थी येथे शुक्रवारी एकत्र अवतरले आणि उपस्थितांनी एक अनोखा सोहळा अनुभवला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे.
बंगळुरू येथील द व्यंकट इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे विद्यार्थी गांधी जयंंतीचे निमित्त साधून शुक्रवारी येथे श्री कांतिरवा स्टेडियमवर गांधीजींच्या पोशाखात अवतरले. शाळेचे कार्यकारी संचालक शेखर बालकृष्ण यांनी सांगितले की, आमच्या शाळेने हा जागतिक विक्रम केल्यामुळे आम्ही अतिशय आनंदित आहोत. मुलांच्या पोशाखासाठी शाळेला तीस लाख रुपये खर्च आल्याचेही त्यांनी सांगितले. तामिळनाडूत २०१३ मध्ये २९०० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी गांधीजींचा पोशाख परिधान केला होता.
........

Web Title: Bangalore World Records