बंगळुरू- अवघ्या ८ वर्षांच्या चिमुकलीची आत्महत्या
By Admin | Updated: December 2, 2014 16:08 IST2014-12-02T16:05:11+5:302014-12-02T16:08:36+5:30
बंगळुरू येथे अवघ्या ८ वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बंगळुरू- अवघ्या ८ वर्षांच्या चिमुकलीची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. २ - बंगळुरू येथे अवघ्या ८ वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरात कोणीही नसताना या बालिकेने आत्महत्येचे हे पाऊल उचलले अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी या बालिकेने एक चिठ्ठी लिहून ठेवली असून आपल्या या कृत्यास कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये असेही तिने या चिठ्ठीत नमूद केले आहे. दरम्यान ही मुलगी गेल्या २० दिवसांपासून शाळेतही जात नव्हती असे समोर आले असून त्यामुळे तिच्या कृत्यामागे नक्की काय कारण आहे या पोलिस शोध घेत आहेत.
खेळण्या-बागडण्याच्या वयात अवघ्या आठ वर्षांच्या या बालिकेने केलेल्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.