भारत-बांगलादेश पाणी कराराला बॅनर्जींचा विरोध
By Admin | Updated: February 13, 2017 00:33 IST2017-02-13T00:33:35+5:302017-02-13T00:33:35+5:30
पश्चिम बंगालच्या हितसंबंधांवर विपरीत परिणाम करणाऱ्या भारत-बांगलादेश यांच्यातील कोणत्याही पाणी करारात सहभागी व्हायला

भारत-बांगलादेश पाणी कराराला बॅनर्जींचा विरोध
कोलकाता : पश्चिम बंगालच्या हितसंबंधांवर विपरीत परिणाम करणाऱ्या भारत-बांगलादेश यांच्यातील कोणत्याही पाणी करारात सहभागी व्हायला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नकार दिला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिस्ता नदी पाणी वाटप कराराला उधळून लावल्यावर बॅनर्जी यांनी आता बांगलादेशच्या या महत्वाकांक्षी कराराला विरोध केला. गंगा नदीवर बांगलादेशचा धरण बांधण्याचा प्रकल्प आहे. हे धरण बांधल्यावर मुर्शिदाबाद आणि पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात पुराचा
धोका वाढेल व त्याशिवाय बांगलादेशकडे पाण्याचे नियंत्रण जाईल, असे बॅनर्जी यांनी अनेक नदी तज्ज्ञांशी चर्चा करून म्हटले.