वांद्रे पूर्व निवडणूक-
By Admin | Updated: March 28, 2015 01:43 IST2015-03-28T01:43:46+5:302015-03-28T01:43:46+5:30
वांद्रे (पूर्व) पोटनिवडणुकीत तिरंगी लढत

वांद्रे पूर्व निवडणूक-
व ंद्रे (पूर्व) पोटनिवडणुकीत तिरंगी लढतमुंबई- वांद्रे (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार हे शुक्रवारी स्पष्ट झाले. शिवसेनेच्या तृप्ती बाळा सावंत, काँग्रेसचे नारायण राणे व एमआयएमचे राजा सिराज रेहबारखान हे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवार हा अखेरचा दिवस होता. अपक्ष उमेदवारांपैकी चारजणांनी आपले अर्ज मागे घेतले असले तरी मुख्य लढत ज्या तीन उमेदवारांमध्ये आहे, त्यांनी आपले अर्ज कायम ठेवल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यावेळी भाजपाने उमेदवार न देता शिवसेनेला पाठिंबा दिला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही उमेदवार न देता काँग्रेसला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.वांद्रे (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण मतदारांची संख्या २ लाख ६४ हजार ५०३ असून त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ लाख ४५ हजार ९७४ आहे तर महिला मतदारांची संख्या १ लाख १८ हजार ५२४ आहे. या मतदारसंघातील एकूण मतदान केंद्राची संख्या २५४ आहे.मागील २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेचे बाळा सावंत विजयी झाले होते. त्यांना ४१ हजार ३८८ मते मिळाली होती. भाजपाचे कृष्णा पारकर यांना २५ हजार ७९१ मते मिळाली होती. तिसर्या क्रमांकावर एमआयएमचे राजा सिराज रेहबारखान हे होते. त्यांना २३ हजार ९७६ मते मिळाली होती. काँग्रेसचे संजीव भेडीया हे चवथ्या क्रमांकावर होते व त्यांना १२ हजार २२९ मते मिळाली होती. (विशेष प्रतिनिधी)