निष्काळजीपणाचा कळस! रुग्णांना जमिनीवर ठेवून केले जातात उपचार, रुग्णालयातील भयंकर वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 10:30 AM2022-05-07T10:30:25+5:302022-05-07T10:35:12+5:30

बांदा येथील जिल्हा रुग्णालयात हे भीषण वास्तव पाहायला मिळत आहे. ट्रॉमा सेंटरमध्ये काही रुग्ण जमिनीवर पडून उपचार घेत होते.

banda district hospitals doctors treating patient on floor | निष्काळजीपणाचा कळस! रुग्णांना जमिनीवर ठेवून केले जातात उपचार, रुग्णालयातील भयंकर वास्तव

निष्काळजीपणाचा कळस! रुग्णांना जमिनीवर ठेवून केले जातात उपचार, रुग्णालयातील भयंकर वास्तव

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एकीकडे योगी सरकार मंत्र्यांची शिष्टमंडळे जिल्ह्य़ात पाठवत असून सरकारकडून सुरू असलेल्या योजना आणि सुविधांचा आढावा घेतला जात आहे. तर दुसरीकडे बांदा येथे मात्र उत्तम आरोग्य सुविधा आहेत हा मुख्यमंत्र्यांचा दावा फोल ठरल्याचं दिसत आहे. रुग्णांना रुग्णालयात बेडही मिळत नसल्याची धक्कादायक परिस्थिती आहे. बांदा येथील जिल्हा रुग्णालयात हे भीषण वास्तव पाहायला मिळत आहे. ट्रॉमा सेंटरमध्ये काही रुग्ण जमिनीवर पडून उपचार घेत होते. त्याचवेळी कोणीतरी त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.

सोशल मीडियापर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. जिल्हा रुग्णालयाचे सीएमएस एसएन मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिउष्णतेमुळे उलट्या आणि जुलाब होणाऱ्या रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने ट्रॉमा सेंटर इमर्जन्सीमधील सर्व बेड भरले होते, त्यामुळे काही रुग्णांना बेंचवर तर काही रुग्णांना खाली जमिनीवर ठेवले होते. माहिती मिळताच ते तातडीने रुग्णालयात आले आणि जमिनीवर असलेल्या रुग्णांना वॉर्डमध्ये हलवलं आहे. 

सीएमएसने यांनी रुग्णालयात बेडची कमतरता आहे, त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे. 34 स्टाफ नर्सऐवजी केवळ 17 स्टाफ नर्स असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुढे ही समस्या टाळण्यासाठी आयुष्मान वॉर्डात आणखी 15 बेडची व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती दिली आहे. त्याचवेळी पत्नीच्या उपचारासाठी रुग्णालयात पोहोचलेले तीमरदार बन्यान यांनी सांगितले की, पत्नीवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात आलो आहे, मात्र एक तास उलटून गेला तरी अद्याप त्यांना बेड मिळालेला नाही.

रुग्णालयात त्यामुळे जमिनीवरच पत्नीला ठेवलं आहे. एकूणच एकीकडे उन्हाच्या कडाक्याने रुग्णांची संख्या वाढत असतानाच रुग्णालयांचा निष्काळजीपणा समोर येत आहे. तर या जिल्हा रुग्णालयात अवघ्या 5 दिवसांपूर्वी म्हणजे एक मे रोजी प्रभारी मंत्री जयवीर सिंग यांनी परिस्थितीची पाहणी करून जिल्ह्यातील जबाबदार आरोग्य कर्मचाऱ्यांना व्यवस्था सुधारण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: banda district hospitals doctors treating patient on floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.