लग्नाला नकार दिला म्हणून केला बलात्कार

By Admin | Updated: October 12, 2015 18:35 IST2015-10-12T18:35:47+5:302015-10-12T18:35:47+5:30

उत्तरप्रदेशातील भदोही शहरात एका युवतीच्या घरच्यांकडून लग्नाला नकार दिल्याने ज्या युवकासोबत लग्न होणार होते, त्याने थेट युवतीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

Banana rape as marriage refused | लग्नाला नकार दिला म्हणून केला बलात्कार

लग्नाला नकार दिला म्हणून केला बलात्कार

>ऑनलाइन लोकमत
भदोही, दि. १२ - उत्तरप्रदेशातील भदोही शहरात एका युवतीच्या घरच्यांकडून लग्नाला नकार दिल्याने ज्या युवकासोबत लग्न होणार होते, त्याने थेट युवतीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भदोही येथील कटारा बाजारस्थित अनिस अहमद या २२ वर्षीय युवकाचे लग्न २१ वर्षीय युवतीशी होणार होते. मात्र काही कारणाने त्याला युवतीच्या घरच्या मंडळीनी नकार दिला. यामुळे नाराज झालेला अनिस अहमद युवतीच्या घराची मंडळी बाहेर गेल्याचे पाहून तिच्या घरी गेला आणि  त्याने युवतीला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. 
दरम्यान, युवतीच्या घरची मंडळी बाहेरुन आल्यावर झालेला प्रकार युवतीने त्यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलीसांनी अनिस अहमद याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत. 

Web Title: Banana rape as marriage refused