शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींवरील वेब सीरिजवरही बंदी; निवडणूक आयोगाचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 06:51 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटावर बंदी घातल्यानंतर निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्यावरील वेब सीरिजवरही बंदी घालण्याचे आदेश दिले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटावर बंदी घातल्यानंतर निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्यावरील वेब सीरिजवरही बंदी घालण्याचे आदेश शनिवारी दिले. ही वेब सीरिज तयार करणाऱ्या इरॉस नाऊ या कंपनीला निवडणूक आयोगाने तसे कळवले आहे.‘मोदी : जर्नी आफ अ कॉमन मॅन’ असे या वेब सीरिजचे नाव असून, ती पाच भागांची आहे. ती कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित करू नका, असे निवडणूक आयोगाने इरॉस नाऊ या कंपनीला बजावले आहे. सर्व वेब सीरिज आॅनलाइनच दाखविल्या जातात. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे या वेब सीरिज दाखविता येणार नाही. ही पाच भागांची मालिका, तसेच मालिकेशी संबंधित कोणताही भाग दाखवायलाही निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे.

आमच्या पुढील आदेशांपर्यंत ही मालिका दाखविण्यात येऊ नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच निवडणुका होईपर्यंत ती दाखविता येणार नाही, असे दिसते. इरॉस नाऊ ही मुंंबईतील कंपनी असल्याने महाराष्ट्रातील निवडणूक अधिकाºयामार्फत तिला हा आदेश बजावण्यात आला आहे.
नमो टीव्ही सुरूचमोदी यांच्यावरील चित्रपटाच्या प्रदर्शनावर आयोगाने घातलेली बंदी आयोगाने उठवलेली नाही. या बंदीविरोधात चित्रपटाचे निर्माते न्यायालयात गेले आहेत. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तो चित्रपट पाहून आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केला आहे. त्या अहवालाच्या आधारे बंदीबाबतचा निर्णय न्यायालय घेणार आहे. याखेरीज नमो टीव्हीवरही आयोगाने बंदी घातली. पण आम्ही नमो टीव्हीटेलिकास्ट नव्हे, तर वेबकास्ट करतो, अशी पळवाट काढून भाजपने नमो टीव्हीवरून पंतप्रधान मोदी यांची भाषणे व प्रचार सुरूच ठेवला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग