प्लॅस्टिक राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदी शाळा, शिक्षण संस्था: खबरदारी घेण्याचे निर्देश

By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:35+5:302015-01-22T00:07:35+5:30

नागपूर: राष्ट्रध्वजाचा सन्मान कायम ठेवताना प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर टाळा, अशा सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी (प्राथ.आणि माध्य.) त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा, शिक्षण संस्थांना या संदर्भातील सर्व नियम निदर्शनास आणून द्यावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

Ban on the use of Plastic National Flag Schools, Education Institutions: Precautions | प्लॅस्टिक राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदी शाळा, शिक्षण संस्था: खबरदारी घेण्याचे निर्देश

प्लॅस्टिक राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदी शाळा, शिक्षण संस्था: खबरदारी घेण्याचे निर्देश

गपूर: राष्ट्रध्वजाचा सन्मान कायम ठेवताना प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर टाळा, अशा सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी (प्राथ.आणि माध्य.) त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा, शिक्षण संस्थांना या संदर्भातील सर्व नियम निदर्शनास आणून द्यावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार २६ जानेवारी,१५ ऑगस्ट किंवा इतर राष्ट्रीय उत्सवादरम्यान प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यास बंधी घालण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयांनाही याची अंमलबजावणी करायची आहे.
राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशी प्लॅस्टिक झेंड्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते कचऱ्यात टाकले जातात. यामुळे ध्वजाचा अपमान तर होतोच. शिवाय पर्यावरणाचीही हानी होते. त्यामुळे प्रजासत्ताक दिन वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्लॅस्टिक राष्ट्रध्वज बंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा, तालुकावार समित्या
राष्ट्रध्वज वापरण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आणि तालुकापातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय समितीचे स्वत: जिल्हाधिकारी अध्यक्ष असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिव आहेत. पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, शिक्षण उपसंचालक व जिल्हा क्रीडा अधिकारी या समितीचे सदस्य आहेत. तालुकास्तरावर तहसीलदार अध्यक्ष,खंडविकास अधिकारी सचिव आणि ठाणेदार, सा.बा. विभागाचे उपअभियंता, उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका अधीक्षक (भूमी अभिलेख) समितीचे सदस्य असतील. (प्रतिनिधी)

Web Title: Ban on the use of Plastic National Flag Schools, Education Institutions: Precautions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.