दारूसह सर्व मादकपदार्थांवर राज्यात बंदी आणा

By Admin | Updated: August 11, 2015 00:03 IST2015-08-11T00:03:36+5:302015-08-11T00:03:36+5:30

दुष्परिणाम - हायकोर्टात जनहित याचिका

Ban on the State with All Drugs on All Drugs | दारूसह सर्व मादकपदार्थांवर राज्यात बंदी आणा

दारूसह सर्व मादकपदार्थांवर राज्यात बंदी आणा

ष्परिणाम - हायकोर्टात जनहित याचिका
नागपूर : सर्व प्रकारची दारू, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ, मादक द्रव्ये व औषधांचे उत्पादन, विक्री व सेवनावर संपूर्ण राज्यात बंदी आणावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. मादकपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर अनेक प्रकारचे दुष्परिणाम होत आहेत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
अनिल आग्रे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. शासनाने वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत दारूबंदी केली असली तरी, तिन्ही जिल्ह्यांत सर्रास दारू मिळत आहे. सुगंधी तंबाखूवरील बंदीही कागदावरच आहे. समाजाला भेडसावत असलेल्या विविध समस्या लक्षात घेता मादक पदार्थांचे उत्पादन, विक्री व सेवनावर संपूर्ण राज्यात बंदी लागू करणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. यासंदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये वेळोवेळी प्रकाशित झालेल्या बातम्या व लेखासह विविध अहवाल याचिकेला जोडण्यात आले आहेत. या याचिकेत राज्य शासनाच्या गृह विभागाचे सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव व अबकारी विभागाला प्रतिवादी करण्यात आले आहे.

Web Title: Ban on the State with All Drugs on All Drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.