पाकमध्ये भारतीय कार्यक्रमांवर बंदी
By Admin | Updated: October 19, 2016 23:42 IST2016-10-19T22:15:38+5:302016-10-19T23:42:50+5:30
भारतीय चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानने २१ ऑक्टोबरपासून भारतीय कार्यक्रमांवर बंदीचा निर्णय घेतला आहे

पाकमध्ये भारतीय कार्यक्रमांवर बंदी
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १९ : भारतीय चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानने २१ ऑक्टोबरपासून भारतीय कार्यक्रमांवर बंदीचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरणानच्या १२० व्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. यापुर्वीच, १५ ऑक्टोबर पासून पाकमध्ये भारतीय टीव्ही चॅनल्सवर बंदी घातली आहे.
यामुळे भारतीय चॅनल्सवरील आणि पाकिस्तानात लोकप्रिय असलेले कार्यक्रम तेथील जनतेला पाहायला मिळणार नाहीत. तसेच भारतीय वृत्तवाहिन्यांवरील बातम्याही त्यांना समजू शकणार नाहीत. नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराच देण्यात आला आहे.