फेव्हिकॉलच्या 'त्या' जाहिरातीवर बंदी आणा
By Admin | Updated: April 22, 2015 17:43 IST2015-04-22T17:43:00+5:302015-04-22T17:43:00+5:30
'तोडो नही, जोडो' असे सांगणा-या फेव्हिकॉलच्या जाहिरातीवर बंदी आणा अशी मागणी भाजपा खासदार चिंतामणी मालविय यांनी केली आहे.

फेव्हिकॉलच्या 'त्या' जाहिरातीवर बंदी आणा
ऑनलाइन लोकमत
उज्जैन, दि. २२ - 'तोडो नही, जोडो' असे सांगत भारत-पाकिस्तान सैन्याचे एकमेकांबद्दल प्रेम दाखविणा-या फेव्हिकॉलच्या त्या जाहिरातीवर केंद्र सरकारने बंदी आणावी अशी मागणी उज्जैनपूरचे भाजपा खासदार चिंतामणी मालविय यांनी केली आहे.
भारत-पाकिस्तान देशाच्या संवेदनशील विषयाला हात घातलेली फेव्हिकॉलची जाहिरात अनेक टिव्ही चॅनेलवर झळकत आहे. या जाहिरातीमध्ये भारत-पाकिस्तान या दोन देशामधील वाघा सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक दाखविण्यात आले असून पाकिस्तानच्या सैनिकाच्या पायातील बुटाचे तळ फाटलेले दाखविले आहे पण हा बुटाचा फाटलेला तळ भारतीय सैनिक फेव्हिकॉल लावून जोडताना दाखविला आहे. तसेच त्यानंतर 'तोडो नही, जोडो' असे जाहिरातीतून सांगितले आहे. ही जाहीरात भारतीय सैन्याचा अपमान करणारी असून जाहिरात बनविणा-या लेखकावर, निर्मात्यावर, आणि डायरेक्टरवर देशद्रोहाचा खटला दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी चिंतामणी मालविय यांनी केली आहे.