शेतकर्यांची पिळवणूक रोखण्यासाठीच बंदी
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:32+5:302015-09-07T23:27:32+5:30
बाजार समिती सभापती पिंगळेंचा दावा

शेतकर्यांची पिळवणूक रोखण्यासाठीच बंदी
ब जार समिती सभापती पिंगळेंचा दावानाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीत इलेक्ट्रॉनिक वजनकाटे सुरू करण्याचा निर्णय हा शेतकर्यांची पिळवणूक रोखण्यासाठीच घेतला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी दिली. तसेच मागील वर्षीच यासंदर्भात पणन मंडळाने शासन परिपत्रक काढले असून, दोनवेळा यापूर्वीही बाजार समितीच्या आवारातील अनधिकृत वजनकाट्यावरील विक्रीला पायबंद घालण्याचा प्रयत्न झाल्याचे बाजार समिती व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.१ सप्टेंबरपासून बाजार समितीच्या पेठरोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीच्या आवारात इलेक्ट्रॉनिक काट्यावरच शेतकर्यांच्या मालाची-खरेदी विक्री प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय बाजार समितीच्या संचालक मंडळाने व व्यवस्थापनाने घेतला होता. त्यानुसार नवीन बाजार समितीत इलेक्ट्रॉनिक वजनकाटयांद्वारेच खरेदी विक्री करण्यात येत आहे. त्याची अंमलबजावणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुन्या आवारात करण्यात आल्यानंतर सुमारे शंभरहून अधिक किरकोळ व्यापार्यांना साध्या वजनकाट्यावर विक्री करू न देण्याचा निर्णय बाजार समिती व्यवस्थापनाने घेतला आहे. पणन मंडळाच्या आदेशानुसारच शेतकर्यांची बाजार समितीतील होणारी पिळवणूक टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याची पद्धत सुरू करण्यात आल्याचे बाजार समिती व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने पेठरोडकडील बाजूने बाजार समितीत येणारा रस्ता दगडी भिंत घालून बंद केला आहे. याच रस्त्यावर मागील महिन्यात दोघा व्यापार्यांना अडवून लाखोंची लूटमार करण्याच्या घटनेनंतर तत्काळ बाजार समितीने हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. काल ही भिंत पाडण्याचाही प्रयत्न काही समाजकंटकांनी केल्याचे बाजार समिती व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)इन्फो..पणन मंडळाचे आदेशबाजार समितीच्या आवारात केवळ इलेक्ट्रॉनिक वजनकाटयानेच व्यवहार करण्याचे आदेश राज्य पणन मंडळाने मागील वर्षीच दिले आहेत. त्यानुसार यापूर्वीही बाजार समितीत इलेक्ट्रॉनिक वजन काट्यानुसार खरेदी-विक्री प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा आदेश आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बाजार समितीच्या आवारातील संबंधित किरकोळ व्यापार्यांकडून एक महिन्यापासून कोणताही बाजार समितीचा कर वसूल केला जात नाही.अरुण काळे, सचिव नाशिक बाजार समिती.