दिल्लीतील 10 वर्ष जुन्या डिझेल वाहनांवर बंदी
By Admin | Updated: July 18, 2016 13:45 IST2016-07-18T13:45:53+5:302016-07-18T13:45:53+5:30
राष्ट्रीय हरित लवादाने दिल्लीतील 10 वर्ष जुन्या डिझेल वाहनांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयाला दिले आहेत

दिल्लीतील 10 वर्ष जुन्या डिझेल वाहनांवर बंदी
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 18 - राष्ट्रीय हरित लवादाने दिल्लीतील 10 वर्ष जुन्या डिझेल वाहनांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय हरित लवादाने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) हा आदेश दिला असून तात्काळ अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे. नोंदणी रद्द करण्यात आलेल्या डिझेल वाहनांची यादी दिल्ली वाहतूक पोलिसांकडे सोपवण्यात यावी असंही राष्ट्रीय हरित लवादाने आरटीओला सांगितलं आहे.
या निर्णयामुळे दिल्लीतील प्रदुषणाच्या समस्येवर नियंत्रण आणण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय हरित लवादाने संबंधित इतर विभागांनाही कचरा जाळल्याने होणा-या हवा प्रदुषणासंबंधी अहवाल मागवला आहे. ट्रकला मात्र या निर्णयातून तात्पुरती सूट देण्यात आली आहे.