शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'ISI ने केलं कुलभूषण जाधवांचं अपहरण, मुल्ला उमरला दिले कोट्यवधी रुपये'; बलूच नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 11:19 IST

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील कारागृहात यातना सहन करणारे भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचे पाकिस्तानाची गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशाऱ्यावरुन इराणमधील चाबहार येथून अपहरण करण्यात आले होते, असा दावा बलूच नेता मामा कदीर यांनी केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कदीर यांनी हा दावा केला आहे. 

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करणाऱ्या मुल्ला उमर बलूच इराणीनं जाधव यांचं इराणच्या चाबहार येथून अपहरण केले, असा दावा कदीर यांनी मुलाखतीदरम्यान केला आहे. व्हॉईस फॉर मिसिंग बलूच नावाच्या संघटनेकडून याबाबत माहिती मिळाल्याचे कदीरनं सांगितले आहे. कदीर या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत.

''आमचे संयोजक तेथे उपस्थित होते. जाधव यांच्या अपहरणासाठी आयएसआयकडून मुल्ला उमरला कोट्यवधी रुपये देण्यात आले होते'',असेही कदीर यांनी सांगितले. मुल्ला उमर हा आयएसआयचा एजंट म्हणून कुख्यात असून पाकिस्तान सरकारविरोधात आवाज उठवणा-यांचं अपहरण करणारा आयएसआयचा एजंट म्हणून तो ओखळला जातो. 

पुढे त्यांनी कुलभूषण जाधव यांच्या अपहरणाबाबत अशी माहिती दिली की, जाधव यांच्या डोळ्यांवर पट्टी लावून त्यांचे दोन्ही हात बांधण्यात आले होते आणि त्यांना एका कारमधून सुरुवातीला चाहबहारहून इराण आणि बलुचिस्तान सीमा परिसरातील मशकेल शहरात नेले गेले, येथून क्वेटा व त्यानंतर इस्लामाबादमध्ये आणण्यात आले. 

''कुलभूषण जाधव इराणमध्ये एक व्यावसायिक होते, याची माहिती आम्हाला होती. दरम्यान, बलुचिस्तानमध्ये जाधव यांना पकडल्याची घोषणा आयएसआयनं केली. पण जाधव कधीही बलुचिस्तानमध्ये आले नव्हतेच''. कदीर यांनी केलेल्या दाव्यानुसार पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 

काय आहे नेमकी घटना?भारतातील निवृत्त नौदल अधिकारी असलेल्या 46 वर्षीय जाधव यांना मार्च 2016 मध्ये बलुचिस्तानात अटक केल्याचा दावा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला होता. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्यांना हेरगिरी आणि घातपाती कारवायांच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली आहे. भारताने दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश गतवर्षी 13 डिसेंबर रोजी दिले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होऊन आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीस स्थगिती देत पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावली होती. 

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तानIndiaभारत