कुत्र्याशी खेळताना चेंडू घशात अडकून मृत्यू
By Admin | Updated: June 29, 2015 00:38 IST2015-06-29T00:38:19+5:302015-06-29T00:38:19+5:30
कोलकाता : आपल्या पाळीव कुत्र्याशी चेंडू खेळणे एका २७ वर्षांच्या युवकाच्या जीवावर बेतले. कुत्र्याप्रमाणे चेंडू दातात पकडून खेळता खेळता अचानक या युवकाच्या घशात अडकला आणि श्वासनलिका अवरुद्ध होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कुत्र्याशी खेळताना चेंडू घशात अडकून मृत्यू
क लकाता : आपल्या पाळीव कुत्र्याशी चेंडू खेळणे एका २७ वर्षांच्या युवकाच्या जीवावर बेतले. कुत्र्याप्रमाणे चेंडू दातात पकडून खेळता खेळता अचानक या युवकाच्या घशात अडकला आणि श्वासनलिका अवरुद्ध होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.रविवारी दक्षिण कोलकाताच्या लेक गार्डन्स भागात ही घटना घडली. अर्नेश सिंघानिया असे या युवकाचे नाव आहे. अर्नेश आपल्या स्कूबी नावाच्या पामेरियन कुत्र्याशी १.५ इंच व्यासाच्या चेंडूने खेळत होता. अर्नेशने चेंडू आपल्या दातांमध्ये पकडला आणि कुत्रा मान हलवतो प्रमाणेच मान हलवून खेळू लागला. याचदरम्यान अचानक दातातून चेंडू निसटून अर्नेशच्या घशात जाऊन अडकला. घटना घडली तेव्हा त्याचे आई-वडील घरात नव्हते. त्याची काकू आणि घरात हजर असलेल्या मोलकरणीने अर्नेशच्या घशात अडकलेला चेंडू बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण तो निघत नसल्याचे पाहून त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. पण श्वासनलिका बंद झाल्याने अर्नेशने वाटेतच प्राण सोडला. तो बीबीए पदवीधर होता.