शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

बालासोर अपघात: देवदूतासारखी स्थानिकांनी घेतली धाव अन् वाचले शेकडो प्रवाशांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 05:18 IST

अंधारात शर्थ करून जखमींना काढले बाहेर, मिळेल त्या वाहनाने पाठविले रुग्णालयात

बालासोर : सूर्य मावळल्यानंतर सर्वत्र झालेला अंधार. अचानक कानठळ्या बसतील एवढा माेठ्ठा आवाज हाेताे आणि लाेकांचे किंचाळणे ऐकू येते. बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ काेराेमंडल एक्स्प्रेस मालगाडीला धडकली हाेती. तर आणखी एका गाडीचे डबे रुळावरून घसरले. एका क्षणात शेकडाे जीव गेले. अशा बिकटप्रसंगी जवळपास राहणाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून देवदूताप्रमाणे घटनास्थळी धाव घेतली.  अनेक प्रवाशांना अपघातग्रस्त डब्यांमधून बाहेर काढले आणि मिळेल त्या वाहनाने रुग्णालयात पाठविण्यात आले.

गिरी नावाच्या तरुणाने सांगितले की, अंधार असल्यामुळे मदत करणे कठीण हाेते. बचावलेले लाेक त्यांच्या आप्तेष्टांना शाेधत हाेते. अनेक जणांचे माेबाइल हरविले हाेते. त्यामुळे आम्ही आमच्या फाेनवरून लाेकांचे नातेवाइकांशी बाेलणे करून दिले. लहान मुले रडत हाेती. त्यांच्या आई-वडिलांचा शाेध लागत नव्हता. अनेक मृतदेहांचे तुकडे झाल्यामुळे ते गोळा करताना लोकांचा आक्राेश ऐकू येत हाेता. (वृत्तसंस्था)

प्रत्येक जण घाबरलेला हाेता

डब्यात अडकलेली मुले व महिला यांना बाहेर काढण्यासाठी शिड्यांचा आधार घ्यावा लागला. अनेकांचे मृतदेह बाहेर काढले. वाचलेल्या लाेकांना आम्ही पाणी दिले. प्रत्येक जण घाबरलेला हाेता. काेणाला काहीच कळत नव्हते. बचाव पथक व इतर अधिकारी आल्यानंतर आणखी लाेकांना बाहेर काढण्यात आले.

एका रात्रीत जमा झाले ५०० युनिट रक्त 

भीषण रेल्वे अपघातानंतर मानवतेचे उदाहरण देणारी काही छायाचित्रे समोर आली आहेत. ज्यात जखमींना रक्तदान करण्यासाठी रुग्णालयांमध्ये स्थानिक लोकांच्या लांबच लांब रांगा दिसतात. जखमींसाठी अचानक रक्ताची मागणी वाढणार हे ओळखून स्थानिक लोक रात्रीच मदतीसाठी धावले. रक्तदान करण्यासाठी लोक स्वत:हून हॉस्पिटलमध्ये पोहोचले. बालासोरमध्ये तर एका रात्रीत ५०० युनिट रक्त जमा झाल्याचे सांगण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार, रात्रीतूनच रक्तदानासाठी लोकांची मोठी रांग लागली. काही दाेन तास उभे होते, तर काही चार तास उभे होते. जखमींना मदत करण्यासाठी रात्री बालासोर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाेन हजाराहून अधिक लोक जमले आणि अनेकांनी रक्तदानही केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘कवच’ असते तर टाळता आला असता रेल्वे अपघात!

शुक्रवारी संध्याकाळी ज्या रेल्वे मार्गावर भीषण अपघात झाला त्या मार्गावर ‘कवच’ उपलब्ध नव्हते, असे रेल्वेने सांगितले. ‘कवच’ म्हणजे काय? धावत्या रेल्वे गाड्यांची सुरक्षा वाढविण्यासाठी भारतीय रेल्वेने ‘कवच’ नावाची स्वतःची स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली विकसित केली आहे. कवच हे तीन भारतीय व्हेंडर्सच्या सहकार्याने रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनने (आरएसडीओ) स्वदेशी पद्धतीने विकसित केले आहे.

ही यंत्रणा लोको पायलटला धोक्याच्या क्षणी आणि अतिवेगात सिग्नल जंप करण्यापासून दूर ठेवण्यासोबतच दाट धुक्यासारख्या प्रतिकूल हवामानातही ट्रेन सुरळीत धावण्यास मदत करते. कवच एकूणच ट्रेनची सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवते.

असे आहे ‘कवच’

लोको पायलट ब्रेक लावू न शकल्यास ऑटोमॅटिक ब्रेकद्वारे ट्रेनचा वेग नियंत्रित होतो. ही यंत्रणा ट्रेनच्या गतीवर, हालचालीवर सतत लक्ष ठेवते आणि त्याचे सिग्नल पाठवत राहते. कोणतीही दुर्घटना घडल्यास जवळपासच्या ट्रेनवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एसओएस’चे फीचर थेट लोको ते लोको संवादाद्वारे टक्कर टाळणे. लेव्हल-क्रॉसिंग गेट्सवर आपोआप शिट्टी वाजणे. दक्षिण मध्य रेल्वेच्या लिंगमपल्ली-विकराबाद-वाडी आणि विकाराबाद-बिदर सेक्शनवर २५० किलोमीटर अंतरावर चाचण्या झाल्या.  नवी दिल्ली-हावडा आणि नवी दिल्ली-मुंबई विभागांवर मार्च २०२४ पर्यंत कार्यान्वित करण्याचे लक्ष्य आहे.

मनोरंजन विश्वही हळहळले

- ओडिशामधील भीषण रेल्वे अपघातामुळे अनेकांचा थरकाप उडाला. अपघाताची भीषणता पाहुन लोकांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. 

- जवळपास सर्वच स्तरांतील लोकांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले.  

- सलमान खान, रितेश देशमुख, माधुरी दीक्षित, परिणिती चोप्रा, काजोल, करिना कपूर यांच्यासह ज्युनियर एनटीआर, चिरंजीवी अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. 

- चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही दुःख व्यक्त करतानाच एकाचवेळी तीन ट्रेनचा अपघात कसा काय होऊ शकतो? याला कोण जबाबदार? असा सवाल विचारत संतापही व्यक्त केला.

संपूर्ण देशाचे डाेळे पाणावले

बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेसला झालेल्या अपघाताच्या बातमीने दुःख झाले. जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो, ही सदिच्छा. -  राहुल गांधी, काँग्रेस नेते.

बालासोर रेल्वे दुर्घटनेतील २०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. - नितीश कुमार, मुख्यमंत्री, बिहार.

अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अपघातग्रस्त प्रवाशांच्या मदतीसाठी रात्रभर अविश्रांत काम करणाऱ्या स्थानिकांसह बचाव पथकाचे मनापासून आभार. - नवीन पटनायक, मुख्यमंत्री, ओडिशा.

बालासोर रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. तमिळनाडू सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. - एम. के. स्टॅलिन, मुख्यमंत्री, तामिळनाडू.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता रेल्वे अपघात होणार नाही, अशी घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली होती. ही यंत्रणा रेल्वे बसवली होती का? असेल तर ती कार्यरत का नव्हती? याचा तपास व्हायला हवा. - फारूख अब्दुल्ला, अध्यक्ष, नॅशनल कॉन्फरन्स.

 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातIndian Railwayभारतीय रेल्वे