शिल्लक बातमी —————————————————————

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:29+5:302015-02-18T00:13:29+5:30

—

Balance news | शिल्लक बातमी —————————————————————

शिल्लक बातमी —————————————————————

—
br>फोटो ओळी : काटेवाडी येथे उत्कर्ष काळे याचा सत्कार करताना सुनेत्रा पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, प्रशांत काटे, एकनाथराव काटे.
१७०२२०१५-बारामती-०४
————————————————
काटेवाडी ग्रामस्थांनी केला
युवा कुस्तीपटूचा सत्कार
हिंदकेसरी कुस्ती
स्पर्धेत सुवर्णपदक
काटेवाडी : महाराष्ट्र हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत उत्कर्ष काळे याने सुवर्णपदक पटकावले आहे. या यशाबद्दल उत्कर्ष याचा ग्रामस्थांच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी राज्यातील विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या मिलिंद काटे, जितेंद्र काटे,अभिजित काटे, सागर देवकर,अरुण फडतरे, सागर भिसे, निकिता देवकाते, आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच आयएसओ मानांकन मिळविल्याबद्दल जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत जाधव यांच्यासह शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी आमदार दत्तात्रय भरणे, सुनेत्रा पवार, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप, प्रशांत काटे, संभाजी होळकर, उद्योजक शिवाजीराव काळे, एकनाथराव काटे, आदी उपस्थित होते. स्वागत सरपंच गौरी काटे, उपसरपंच जयश्री सुतार यांनी केले. सूत्रसंचालन अनिल रुपनवर यांनी केले.
——————————————————
(संपादन : बापू बैलकर)

Web Title: Balance news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.