रिअल लाईफमध्येही सलमान होणार बजरंगी भाईजान
By Admin | Updated: August 4, 2015 14:43 IST2015-08-04T14:31:00+5:302015-08-04T14:43:08+5:30
१५ वर्षांपासून पाकिस्तानमध्ये असलेल्या गीता या मुकबधीर भारतीय मुलीच्या मदतीसाठी अभिनेता सलमान खानने पुढाकार घेतला आहे.

रिअल लाईफमध्येही सलमान होणार बजरंगी भाईजान
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - १५ वर्षांपासून पाकिस्तानमध्ये असलेल्या गीता या मुकबधीर भारतीय मुलीच्या मदतीसाठी अभिनेता सलमान खानने पुढाकार घेतला आहे. गीताच्या पालकांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी मदत करु असे आश्वासन सलमानने दिल्याचे पाकचे माजी मंत्री व मानवाधिकार कार्यकर्ते अन्सार बर्नी यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानमधील कराची येथील बिल्किस एधी यांच्या गीता नामक मुलगी राहतो. गीता ही मुकबधीर असून ती १५ वर्षांपूर्वी लाहोर येथे आढळली होती. भारतातून आलेल्या रेल्वे गाडीने ती पाकिस्तानमधील लाहोर येथे पोहोचली होती. गीताच्या पालकांचा शोध घेण्यासाठी पाकमधील सामाजिक कार्यकर्ते व माजी मंत्री अन्सार बर्नी व त्यांच्या सहका-यांनी अथक प्रयत्न केले. मात्र यात त्यांना अपयश आले होते.
नुकताच प्रदर्शित झालेल्या बजरंगी भाईजान या चित्रपटात सलमान खान पाकमधून आलेल्या एका मुकबधीर मुलीला असंख्य अडचणीवर मात करत पुन्हा पाकमध्ये सोडतो. हा चित्रपट पाकमध्येही लोकप्रिय ठरला असून बजरंगी भाईजानने आता गीताच्या पालकांचा शोध घेण्यातही मदत करावी असे आवाहन बर्नी यांनी केले होते. बर्नी यांच्या आवाहानला दिग्दर्शक कबीर खानने प्रतिसाद दिला आहे. सलमान व आम्ही यात सर्वतोपरी मदत करु असे कबीरने आम्हाला कळवले आहे अशी माहिती बर्नी यांनी ट्विटरवर दिली आहे.