लालू प्रसाद यादव यांना जामीन; सर्वांना पासपोर्ट जमा करण्याचे कोर्टाने दिले निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2024 08:31 IST2024-10-08T08:30:18+5:302024-10-08T08:31:16+5:30

न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करून राजकीय षड्यंत्राने मुद्दाम त्रास दिला जात असल्याचे तेजस्वी यादव म्हणाले.

bail to lalu prasad yadav | लालू प्रसाद यादव यांना जामीन; सर्वांना पासपोर्ट जमा करण्याचे कोर्टाने दिले निर्देश

लालू प्रसाद यादव यांना जामीन; सर्वांना पासपोर्ट जमा करण्याचे कोर्टाने दिले निर्देश

एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : ‘लँड फॉर जॉब’ घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव, मिसा भारती आणि तेजप्रताप यादव यांच्यासह आठ आरोपींना दिल्लीतील विशेष न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला. दरम्यान, या सर्वांना पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. 

न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करून राजकीय षड्यंत्राने मुद्दाम त्रास दिला जात असल्याचे तेजस्वी यादव म्हणाले. केंद्र सरकार संस्थांचा गैरवापर करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 


 

Web Title: bail to lalu prasad yadav