आंबेडकरनगर हाणामारी प्रकरणातील संशयितांना जामीन
By Admin | Updated: May 11, 2016 00:26 IST2016-05-11T00:26:39+5:302016-05-11T00:26:39+5:30
जळगाव : आंबेडकरनगरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या हाणामारी प्रकरणातील दोन्ही गटाच्या २० संशयित आरोपींची जिल्हा न्यायालयाने मंगळवारी जामिनावर सुटका केली.

आंबेडकरनगर हाणामारी प्रकरणातील संशयितांना जामीन
ज गाव : आंबेडकरनगरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या हाणामारी प्रकरणातील दोन्ही गटाच्या २० संशयित आरोपींची जिल्हा न्यायालयाने मंगळवारी जामिनावर सुटका केली.अटकेनंतर शनिपेठ पोलिसांनी दोन्ही गटाच्या संशयित आरोपींना मंगळवारी दुपारच्या सुमारास न्यायाधीश ए.एम. मानकर यांच्या न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. पहिल्या गटातील सतीश मिलिंद गायकवाड, सचिन दशरथ सैंदाणे, गणेश राजेश सोनवणे, लक्ष्मी सचिन सैंदाणे व रेखा विजय जाधव यांना जामीन मंजूर झाला. त्यांच्यातर्फे ॲड.अजय सिसोदिया यांनी कामकाज पाहिले. तर दुसर्या गटातील सुरेश पोपट पवार, गोविंद पंडित सोनवणे, दीपक पोपट पवार, भारत पंडित सोनवणे, पंकज चंद्रकांत सोनवणे, राहुल कांतीलाल सोनवणे, सीमा गौतम तायडे, गोरख चंद्रमणी तायडे, बंटी चंद्रकांत सोनवणे, चंद्रमणी भिकारी तायडे, वर्षा रोहिदास सावळे, वंदना गोविंद सोनवणे, संगीता भारत सोनवणे, उज्ज्वला दीपक बाविस्कर व विशाल कैलास सोनवणे यांना जामीन मंजूर झाला. त्यांच्यातर्फे ॲड.विजय दाणेज यांनी कामकाज पाहिले.