बनावट नोटा प्रकरणातील आरोपीस जामीन
By Admin | Updated: May 21, 2014 00:16 IST2014-05-21T00:16:19+5:302014-05-21T00:16:19+5:30
सोलापूर : लोकसभा निवडणूक प्रचारकाळात भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याच्या उद्देशाने बनावट नोटा तयार करुन त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणारा आरोपी नागराज सुभाष कचेरी (वय 28, रा़ माँसाहेब विडी घरकूल, सोलापूर) याला सत्र न्यायाधीश एस़ डी़ अगरवाल यांनी जामीन मंजूर केला़

बनावट नोटा प्रकरणातील आरोपीस जामीन
स लापूर : लोकसभा निवडणूक प्रचारकाळात भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याच्या उद्देशाने बनावट नोटा तयार करुन त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणारा आरोपी नागराज सुभाष कचेरी (वय 28, रा़ माँसाहेब विडी घरकूल, सोलापूर) याला सत्र न्यायाधीश एस़ डी़ अगरवाल यांनी जामीन मंजूर केला़ निवडणूक प्रचारकाळात नागराज कचेरी हा बनावट नोटा बनवून चलनात आणत असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती़ या नोटा घेऊन तो अक्कलकोटला जाण्याची तयारी करीत असल्याची खबर मिळताच 20 मार्च रोजी गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात घेतल़े त्याची झडती घेतली असता 10, 50, 100, 500 आणि 1000 रुपयांच्या बनावट 73 नोटा आढळल्या़ तसेच त्याच्या घरी छापा टाकला असता बनावट नोटा तयार करण्याचे स्कॅनर, प्रिंटर, रंगाच्या बाटल्या आणि कटर असे साहित्य जप्त केल़े याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे फौजदार भुजंगराव आदटराव यांनी कचेरीविरुद्ध फिर्याद दिली़ त्याला न्यायालयात हजर केले असता, सत्र न्यायाधीशांनी 15 हजारांच्या जातमुचलक्यावर त्याचा जामीन मंजूर केला़ याप्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अँड. प्रवीण शेंडे तर आरोपीच्या वतीने अँड़ यु़ डी़ जहागीरदार आणि अँॅड़ रियाज शेख यांनी काम पाहिल़े