हेम मिश्राला जामीन

By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:41+5:302015-09-03T23:05:41+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नक्षल समर्थक हेम केशवदत्त मिश्राला सशर्त जामीन मंजूर केला. मिश्रा उत्तराखंड येथील रहिवासी असून, तो गडचिरोली जिल्‘ातील एटापल्ली येथे रेकी करताना आढळून आला होता.

Bail to Hem Mishra | हेम मिश्राला जामीन

हेम मिश्राला जामीन

गपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नक्षल समर्थक हेम केशवदत्त मिश्राला सशर्त जामीन मंजूर केला. मिश्रा उत्तराखंड येथील रहिवासी असून, तो गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे रेकी करताना आढळून आला होता.
मिश्रा दिल्लीतील पं. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी व डेमोक्रेटिक स्टुडंट युनियन या प्रतिबंधित संघटनेचा सदस्य आहे. तो नक्षली नेत्यांच्या संपर्कात होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. अटक केल्यानंतर त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले. जामिनावर बाहेर पडल्यानंतर त्याला दर रविवारी अल्मोडा पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागेल. मिश्रातर्फे ॲड. एस.पी. गडलिंग यांनी बाजू मांडली.

Web Title: Bail to Hem Mishra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.