शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 11:35 IST

Raja Bhaiya News: उत्तर प्रदेशमधील राजकारणात बाहुबली नेते म्हणून प्रसिद्ध असलेले आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांच्या कुटुंबात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. राजा भैय्या आणि त्यांची पत्नी भानवी सिंह यांच्यात तीव्र मतभेद झाले असून, आता या वादामध्येत्यांच्या मुलांनीही उडी घेतली आहे.

उत्तर प्रदेशमधील राजकारणात बाहुबली नेते म्हणून प्रसिद्ध असलेले आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांच्या कुटुंबात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. राजा भैय्या आणि त्यांची पत्नी भानवी सिंह यांच्यात तीव्र मतभेद झाले असून, आता या वादामध्येत्यांच्या मुलांनीही उडी घेतली आहे. तसेच राजा भैय्या यांचा धाकटा मुलगा ब्रिजराज प्रताप सिंह याने वडिलांची बाजू घेत आई भानवी सिंह हिच्यावर टीका केली आहे.  तर थोरला मुलगा शिवराज प्रताप याने राजा भैय्या यांच्या घरात वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन असल्याच्या भानवी सिंह यांनी केलेल्या आरोपाला सोशल मीडियावर पोस्ट लिहून प्रत्युत्तर दिले आहे. तसेच आमच्या घरात अणुभट्ट्या आहेत का? असा सवाल त्याने उपस्थित केला आहे.

भानवी सिंह यांनी केलेल्या आरोपांना राजा भैय्या यांचा धाकटा मुलगा ब्रिजराज प्रताप सिंह यानेही सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून आई-वडील आणि मुलांमध्ये सुरू असलेला वाद आणि घरात घातक हत्यार असल्याच्या आरोपांपर्यंत सर्वावर स्पष्टीकरण दिलं आहे. शिवराज प्रताप सिंह आणि ब्रिजराज प्रताप सिंह यांनी त्यांच्या पोस्टमधून आई भानवी सिंह ही वडिलांना बदनाम करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच हा एक राजकीय कट असल्याचाही दावा केला आहे.

शिवराज प्रताप सिंह याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, आईने कोर्टामध्ये १०० कोटी रुपये एकरकमी देण्याची आणि २५ लाख रुपये दरमहा देण्याची मागणी केली आहे. आईकडे वडिलांपेक्षा अधिक स्थावर मालमत्ता आहे. तरीही ती पीडित असल्याचा आणि महिला असल्याचा भावूक दावा करत आहे, असा आरोप मुलांनी केला आहे.

आमची आई स्वत: घर सोडून गेली होती. तसेच १० वर्षांहून अधिक काळापासून ती वेगली राहत आहे. आई-वडिलांनी समजूत घातल्यानंतरही ती माघारी परतली नाही, असा आरोप शिवराज प्रताप सिंह याने केला. तर आमची आजी रुग्णालयात होती. तसेच तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी आई आपल्या कुटुंबाची इज्जत रस्त्यावर आणत होती. आता आम्ही  दोन्ही भाऊ आईचं पुढचं लक्ष्य असू, असा दावा ब्रिजराज प्रताप सिंह याने केला आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Raja Bhaiya's Sons Accuse Mother: Serious Allegations in Family Feud

Web Summary : Raja Bhaiya's sons have publicly criticized their mother amid a family dispute. They refuted claims of weapons at home, alleging she seeks excessive alimony and is tarnishing their father's reputation for political gain, despite possessing substantial assets.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश