शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:29 IST

या गाडीतून आलेल्या सैनिकांनी घराचे कुलूप तोडले. घराचे गेट उखडून ते लष्कराच्या गाडीत ठेवले. घरातील साहित्याची नासधूस केली. हिमांशीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला, पण तिलाही मारहाण करत, जर या घरात राहाल, तर सर्वांना गोळ्या घालण्यात येतील, अशी धमकी देण्यात आली.

बागपतमध्ये दोन भावांमधील घराच्या वाटणीवरून झालेल्या वादात भारतीय लष्कराच्या जवानांची एन्ट्री झाली. सैन्यातदलात कर्नल पदावर कार्यरत असलेल्या एका भावाने आपल्या दुसऱ्या भावाकडून आणि काकांकडून घराचा ताबा घेण्यासाठी लष्कराची एक तुकडीच आणली. अर्धा डझन जवान चित्रपटातील एखाद्या सीन प्रमाणे गावात आले आणि त्यांनी घराचे गेट आणि कुलूप तोडून घराचा ताबा घेतला. एवढेच नाही तर, सैनिकांनी हातोड्याच्या साहाय्याने घराचे लोखंडी गेट तोडले आणि ते त्यांच्या ट्रकमध्ये टाकून घेऊन गेले. सैनिकांनी घराचे कुलूप आणि गेट तोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर, बडोत कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

लेफ्टनंट कर्नल तरुण कुमार जम्मू आणि काश्मीरमधील सिग्नल रेजिमेंटमध्ये तैनात आहेत. ते मेरठच्या लष्करी वाहनात सैनिकांना घेऊन आले. वाजिदपूर गावातील रहिवासी धीर सिंह तोमर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते २०१२ मध्ये सरूरपूर खेडकी या गावातील इंटर कॉलेजमधून प्राचार्य पदावरून निवृत्त झाले आहेत. ते सध्या त्यांची पत्नी सुशीला आणि अल्पवयीन नात हिमांशीसह गावात राहतात. हिमांशी ११ व्या वर्गात शिकते.

ले. कर्नल तरुण कुमारने लष्कराच्या वाहनातून आणले होते सैनिक -  धीर सिंह तोमर यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर डिसेंबर 2024 मध्ये घर बांधायला सुरुवात केली. त्यांनी हे घर नात हिमांशीला भेट दिले होते. हिमांशीच्या वडिलांचे २०११ मध्ये निधन झाले आहे. धीर सिंह म्हणाले, घर तयार झाल्यानंतर, आपला धाकटा भाऊ ऋषिपाल आणि त्यांचा मुलगा लेफ्टनंट कर्नल तरुण कुमार यांनी १७ मे २०२५ रोजी घराचे कुलूप तोडले. १९ मे रोजी दुपारी २ वाजता ऋषिपाल, त्यांची पत्नी आणि मुलगा लेफ्टनंट कर्नल तरुण कुमार काही सैनिकांना लष्कराच्या गाडीत घेऊन आले.

सैनिकांनी हातोड्याने तोडले घराचे गेट -गाडीच्या नंबर प्लेटवर पांढऱ्या रंगाचा कागद चिकटवण्यात आला होता. या गाडीतून आलेल्या सैनिकांनी घराचे कुलूप तोडले. घराचे गेट उखडून ते लष्कराच्या गाडीत ठेवले. घरातील साहित्याची नासधूस केली. हिमांशीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला, पण तिलाही मारहाण करत, जर या घरात राहाल, तर सर्वांना गोळ्या घालण्यात येतील, अशी धमकी देण्यात आली.

टॅग्स :SoldierसैनिकPoliceपोलिस