बॅगला ब्लेड मारून १ लाखाची चोरी बसस्थानकातील घटना: अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल

By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:17+5:302015-08-27T23:45:17+5:30

लातूर: लातूर बसस्थानकातून नांदेडला निघालेल्या एका प्रवाशाच्या बॅगला ब्लेड मारून अज्ञात चोरट्याने एक लाख रूपये चोरून पोबारा केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली़

Bagh blade case: 1 lac robbery case: FIR registered against unknown thieves | बॅगला ब्लेड मारून १ लाखाची चोरी बसस्थानकातील घटना: अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल

बॅगला ब्लेड मारून १ लाखाची चोरी बसस्थानकातील घटना: अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल

तूर: लातूर बसस्थानकातून नांदेडला निघालेल्या एका प्रवाशाच्या बॅगला ब्लेड मारून अज्ञात चोरट्याने एक लाख रूपये चोरून पोबारा केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली़
शहरातील मध्यवर्ती बसस्थानाकतून नांदेडकडे जाण्यासाठी कुर्डूवाडी-नांदेड या बसमध्ये चढणार्‍या एका प्रवाशांच्या बॅगला ब्लेड मारून बॅगमधील दोन लाखापैकी एक लाख रूपये चोरून अज्ञात चोरट्याने पोबारा केल्याची घटना बुधवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली़या प्रकरणी श्रीकांत हरिभाऊ बंडेवार रा़किल्ला रोड सराफा नांदेड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द कलम ३७९ नुसार गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़या प्रकरणाचा अधिक तपास पोहेका जगताप करीत आहेत़

Web Title: Bagh blade case: 1 lac robbery case: FIR registered against unknown thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.