शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बागेश्वर धाम पुन्हा चर्चेत; २८ वर्षीय तरुणी झाली गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 09:12 IST

फिरोजाबादमधील रहिवासी नीलम सिंह पती देवेंद्र सिंह याच्या सोबत बागेश्वर धाम येथे आली होती

भोपाळ : मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात पं. धीरेंद्र शास्त्री यांच्या बागेश्वर धाममध्ये आपल्या पित्यासमवेत आलेली नीरज मौर्य (२८ वर्षे) ही मुलगी तिथून १२ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाली आहे. तसेच किडनी विकाराने त्रस्त असलेली नीलम सिंह (३३ वर्षे) ही महिला आपल्या पतीसह या धाममध्ये दर्शनासाठी आली होती. ती रांगेत उभी असतानाच अचानक जमिनीवर कोसळली व मरण पावली. या दोन घटनांमुळे बागेश्वर धाम पुन्हा चर्चेत आले आहे.

फिरोजाबादमधील रहिवासी नीलम सिंह पती देवेंद्र सिंह याच्या सोबत बागेश्वर धाम येथे आली होती. नीलम  भाविकांच्या रांगेत उभी असताना अचानक जमिनीवर कोसळली व मरण पावली. तिचे पती देवेंद्र सिंह यांनी सांगितले की, गेल्या एक आठवड्यापासून मी पत्नीसह दररोज बागेश्वर धाममध्ये परिक्रमा करत होतो. नीलमच्या प्रकृतीत सुधारणा जाणवत होती. मात्र बुधवारी दुपारी पत्नीची प्रकृती बिघडली. मात्र असे चढउतार नेहमीच होत असल्याने मला त्यात फार गंभीर असे काही वाटले नाही. तिला बागेश्वर धाममधील अंगाराही दिला होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामPoliceपोलिस