बदामी, पारीख, मनीष, हिमांशू फायनल क्वालीफायरमध्ये
By Admin | Updated: September 13, 2014 22:59 IST2014-09-13T22:59:57+5:302014-09-13T22:59:57+5:30

बदामी, पारीख, मनीष, हिमांशू फायनल क्वालीफायरमध्ये
>मुंबई: बंगालचा मनीष जैन आणि मुंबईचे हसन बदामी, सिद्धार्थ पारीख आणि हिमांशू जैन यांनी पहिल्या टप्यातील क्वालीफायरच्या उपांत्यफेरीमध्ये स्थान पटकावत पुढील वर्षी मार्चमध्ये होणार्या इंडियन ओपन स्नूकरच्या अंतिम क्वालीफाईंग राऊंडमधील स्थान पक्के केल़े बदामीने क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईचा राहुल सचदेवला 4-2 ने हरवल़े हिमांशूने पुण्याच्या योगेश शर्माचा 4-1 ने पराभव केला़ पारीख, मनीष यांनी आपल्या क्वार्टर फायनल मॅच फ्रेम न गमावता विजय नोंदवला़