बादल यांच्या अहंकाराचा पराभव

By Admin | Updated: March 12, 2017 00:56 IST2017-03-12T00:56:06+5:302017-03-12T00:56:06+5:30

पंजाबमधील काँग्रेसचा विजय हा अकाली दलाचे नेते बादल यांच्या अहंकाराचा पराभव आहे. काँगे्रसच्या देशातील पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाला आहे,

Badal's ego defeat | बादल यांच्या अहंकाराचा पराभव

बादल यांच्या अहंकाराचा पराभव

अमृतसर : पंजाबमधील काँग्रेसचा विजय हा अकाली दलाचे नेते बादल यांच्या अहंकाराचा पराभव आहे. काँगे्रसच्या देशातील पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी प्रतिक्रिया देत पत्रकारांशी बोलताना नवजोत सिंग सिद्धू म्हणाले की, ही तर एक सुरुवात आहे. पक्ष पुन्हा नव्या जोमाने देशभरात पुढे जाईल. लोकांचा काँग्रेसवर जो विश्वास आहे त्याचे प्रतिबिंब या निकालातून दिसून येत आहे. पंजाब काँग्रेसच्या वतीने पक्ष नेतृत्वाला दिलेली ही भेट आहे. निवडणुकीपूर्वी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले सिद्धू म्हणाले की, जेंव्हा अहंकार येतो तेंव्हा विनाश होतो. अकाली दलावर टीका करताना ते म्हणाले की, या व्यक्तींनी पंजाबला लुटले आणि आपले खिसे भरले.
येथील जनता त्यांच्यामुळे त्रस्त होती. लोकांनी अकाली दलाचा अहंकार उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे. लोकांनी काँग्रेसवर विश्वास दर्शविला आहे. तो आम्ही सार्थ ठरवू.

- विजयी झालेल्या सिद्धू यांना ६० हजार ४७७ मते मिळाली.

Web Title: Badal's ego defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.