शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पीएम मोदीबद्दल अक्षेपार्ह शब्द; मल्लिकार्जुन खर्गेंच्या मुलाला निवडणूक आयोगाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 20:59 IST

ECI Show Cause Notice: निवडणूक आयोगाने भाजप नेते बसनगौडा पाटील यांनाही नोटीस बजावली आहे.

ECI Notices To Priyank Kharge: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा आणि आमदार प्रियांक खर्गे यांना बुधवारी (3 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रथमदर्शनी हे आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियांक खर्गे यांनी अलीकडेच त्यांच्या एका निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदींसाठी 'नालायक' हा शब्द वापरला होता. प्रियांक हे कर्नाटकातील चित्तापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. यावेळीही ते याच जागेवरुन निवडणूक लढवत आहेत.

भाजप आमदारालाही ECI नोटीससोनिया गांधींबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल निवडणूक आयोगाने भाजप आमदार बसनगौडा आर पाटील (यत्नाल) यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बसनागौडा हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत. अलीकडेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटकातील त्यांच्या एका निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदींसाठी 'विषारी साप' शब्द वापरल्यानंतर, बसनगौडा यांनी सोनिया गांधींसाठी 'विष्कन्या' शब्द वापरला होता.

गुरुवारी सायंकाळपर्यंत उत्तर मागितले

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रियंक खर्गे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर नोटीस बजावली असून, त्यांच्यावर कारवाई का करू नये, अशी विचारणा केली आहे. प्रियांक खर्गे यांना गुरुवारी (4 मे) सायंकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. भाजपने प्रियांका यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार केली होती. त्याचवेळी बसनागौडा यांनाही गुरुवारी (4 मे) सायंकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. बसनगौडा यांच्याविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग