शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

"वाईट अभिनेत्री बेडवर झोपण्यास तयार असतात"

By admin | Updated: July 6, 2017 12:11 IST

"मल्याळम चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊच अस्तित्वात नाही. मात्र खराब अभिनेत्री आपल्या इच्छेने बेडवर झोपू शकतात"

ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपुरम, दि. 6 - मल्याळम चित्रपट कलाकार असोसिएशनचे अध्यक्ष आणि खासदार इनोसंट वरीद थेकेथला यांनी कास्टिंग काऊचवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचवर बोलताना खासदार इनोसंट बोलले आहेत की, "मल्याळम चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊच अस्तित्वात नाही. मात्र खराब अभिनेत्री आपल्या इच्छेने बेडवर झोपू शकतात". इनोसंट यांनी सांगितलं आहे की, "आज वेळ बदलली आहे. जर एखाद्या महिलेसमोर  इनडिसेंट प्रपोजल ठेवण्यात आला तर ती गोष्ट प्रसारमाध्यमांमध्ये येण्यासाठी एक सेकंदही लागत नाही".
 
आणखी वाचा - 
"या" राजकारण्यावर अभिनेत्रीने केला कास्टिंग काऊचचा आरोप
राधिका आपटेलाही आला होता कास्टिंग काउचचा अनुभव
...म्हणून प्रियांका चोप्राने मोदींना भेटायला जाताना घातला शॉर्ट ड्रेस
 
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना इनोसंट यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते बोलले की, "मल्याळम चित्रपटसृष्टी एकदम स्वच्छ आहे, आणि कास्टिंग काऊचसारखा कोणताही प्रकार सध्या अस्तित्वात नाही. आता जुने दिवस राहिलेले नाहीत. सध्या परिस्थिती अशी आहे की, एखाद्या महिलेसोबत वाईट वर्तवणूक जरी केली तर लगेच प्रसारमाध्यमांना माहिती मिळते. मात्र जर ती महिला वाईट असेल तर ती बेड शेअर करु शकते". इनोसंट सीपीएम समर्थित अपक्ष खासदार आहेत.
 
गेल्या आठवड्यात मल्याळम चित्रपट कलाकार असोसिएशनकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेला अभिनेते दिलीप, मोहनलाल, ममूटी, आमदार मुकेश आणि केरळचे माजी परिवहन मंत्री गणेश कुमार उपस्थित होते. पत्रकार परिषदेत एका अभिनेत्रीच्या छेडछाडीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावर असोसिएशनची भूमिका काय आहे अशी विचारणा पत्रकारांकडून करण्यात आली. 
 

मल्याळम चित्रपटसृष्टीतील महिलांनी नुकतीच वूमन इन सिनेमा कलेक्टिव्ह नावाने एक असोसिएशन सुरु केली आहे. या असोसिएशनने इनोसंट यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. "चित्रपटसृष्टीत नव्याने प्रवेश करु पाहणा-या कलाकारांना अनेकदा वेगवेगळ्या प्रकारे लैगिंक अत्याचाराला सामोरं जावं लागतं. आमच्या काही सहका-यांनीही कास्टिंग काऊचवर उघडपणे भाष्य केलं आहे. चित्रपटसृष्टी सर्व प्रकारच्या लैंगिक शोषणापासून मुक्त आहे हे स्विकारणं कठीण आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची वक्तव्यं करताना काळजी घ्यायला हवी", असं मत असोसिएशनने फेसबूक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. अभिनेत्री मंजू या असोसिएशनची प्रमुख आहे. 
 

वादग्रस्त वक्तव्यानंतर इनोसंट यांनी आपल्या वक्तव्याचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केल्याचा दावा केला आहे. माझा बोलण्याचा तसा काही उद्देश नव्हता, मात्र त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असं त्यांनी सांगितलं आहे.