अतिरक्तस्त्रावामुळे बाळंतीणीचा मृत्यू
By Admin | Updated: August 2, 2016 23:18 IST2016-08-02T23:18:22+5:302016-08-02T23:18:22+5:30
जळगाव: प्रसूती दरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने आशा अरुण पाटील (वय ३० रा.कुसुंबा, ता.जळगाव) या विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली. आशा पाटील यांना आधी तीन अपत्ये आहेत. मंगळवारी त्यांनी चौथ्या अपत्याला जन्म दिला. ही प्रसूती कुसुंबा येथेच झाली. यावेळी प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांना तातडीने १२.१५ वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी दोन पिशव्या रक्त लावण्यात आले, मात्र तरीही रक्तस्त्राव बंद होत नव्हता. शेवटी एक वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अतिरक्तस्त्रावामुळे बाळंतीणीचा मृत्यू
ज गाव: प्रसूती दरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने आशा अरुण पाटील (वय ३० रा.कुसुंबा, ता.जळगाव) या विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली. आशा पाटील यांना आधी तीन अपत्ये आहेत. मंगळवारी त्यांनी चौथ्या अपत्याला जन्म दिला. ही प्रसूती कुसुंबा येथेच झाली. यावेळी प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांना तातडीने १२.१५ वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी दोन पिशव्या रक्त लावण्यात आले, मात्र तरीही रक्तस्त्राव बंद होत नव्हता. शेवटी एक वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.