आसारामने देऊ केली होती लाच

By Admin | Updated: July 21, 2015 22:38 IST2015-07-21T22:38:24+5:302015-07-21T22:38:24+5:30

बलात्काराचा आरोपी असलेला स्वयंघोषित गुरू आसाराम याने साक्षीदाराला लाच देऊन वळविण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप बलात्कार

Bachchan had offered Asaram | आसारामने देऊ केली होती लाच

आसारामने देऊ केली होती लाच

बरेली (उत्तर प्रदेश) : बलात्काराचा आरोपी असलेला स्वयंघोषित गुरू आसाराम याने साक्षीदाराला लाच देऊन वळविण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप बलात्कार पीडितेच्या वडिलांनी केला असून संबंधित संवादाची ध्वनिफीत (आॅडिओ क्लीप) पोलिसांना सादर केली आहे. या साक्षीदाराची हत्या झाल्यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.
आठ महिन्यांपूर्वी या दोघांमधील संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते. जोधपूर बलात्कार प्रकरणातील हत्या झालेला मुख्य साक्षीदार कृपालसिंग याने पीडितेच्या वडिलांना संबंधित टेप दिल्याची माहिती शहाजहाँपूरचे पोलीस अधीक्षक बबलू कुमार यांनी दिली. १० जुलै रोजी हल्ला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कृपालसिंग याचा बरेलीतील रुग्णालयात मृत्यू झाला होता. आसाराम प्रकरणात एकूण नऊ साक्षीदारांवर हल्ले झाले असून त्यापैकी तिघे मृत्युमुखी पडले. राजस्थानच्या जोधपूर आश्रमात आसाराम याने २०१३ साली १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Bachchan had offered Asaram