शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची ताकद वाढणार; संपूर्ण पक्षच हाती कमळ घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 12:25 IST

झारखंड विकास मोर्चाचं भाजपामध्ये विलीनीकरण होणार

रांची: झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी १४ वर्षांनंतर भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. यासाठी १७ फेब्रुवारीला रांचीत एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी झारखंड विकास मोर्चाचं भाजपामध्ये विलीनीकरण करण्यात येईल. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे उपाध्यक्ष ओमप्रकाश माथूर उपस्थित राहणार आहेत. या नेत्यांच्या उपस्थितीत मरांडी झारखंड विकास मोर्चा भाजपामध्ये विसर्जित केला जात असल्याची घोषणा करतील. बाबुलाल मरांडी यांनी काल दिल्लीत भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. यावेळी ओमप्रकाश माथूरदेखील उपस्थित होते. या बैठकीत झारखंड विकास मोर्चाच्या भाजपामधल्या विलीनीकरणाचा दिवस निश्चित करण्यात आला. याआधी शनिवारी बाबुलाल मरांडी यांनी अमित शहांची भेट घेतली होती. झारखंड विकास मोर्चानं ११ फेब्रुवारीला केंद्रीय कार्यकारणीची बैठक बोलावली आहे. यामध्ये झारखंड विकास मोर्चानं विलीनीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला जाईल. यानंतर याबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली जाईल.झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मरांडी यांना घरवापसीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री सी. पी. सिंह यांनी मरांडी यांच्या पक्ष प्रवेशाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ज्यांना भाजपाची विचारसरणी मान्य असेल, ते पक्षात सहभागी होऊ शकतात. भाजपामध्ये व्यक्तीवादाला स्थान नाही. पक्षात केवळ विचारधाराच महत्त्वाची आहे, असं सिंह म्हणाले. २००६ मध्ये बाबुलाल मरांडी भाजपामधून बाहेर पडले. त्यांनी झारखंड विकास मोर्चाची स्थापना केली. गेल्या डिसेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळीच मरांडी घरवापसी करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. या निवडणुकीत मरांडी यांच्या पक्षाला केवळ पाच जागा मिळाल्या. तर भाजपाच्या १२ जागा कमी झाल्यानं त्यांना राज्यातली सत्ता गमवावी लागली.  

टॅग्स :BJPभाजपा