बाबरी मशिदीच्या ज्येष्ठतम पक्षकाराचे निधन
By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:09+5:302014-12-25T22:41:09+5:30
अयोध्या-बाबरी मशीद प्रकरणातील सर्वात जुने पक्षकार मोहम्मद फारुक यांचे बुधवारी वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले.

बाबरी मशिदीच्या ज्येष्ठतम पक्षकाराचे निधन
अ ोध्या-बाबरी मशीद प्रकरणातील सर्वात जुने पक्षकार मोहम्मद फारुक यांचे बुधवारी वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. अयोध्येचे रहिवासी असलेले फारुक हे १९४९ सालच्या बाबरी मश्ीाद प्रकरणातील मुस्लीम पक्षाच्या सात मुख्य पक्षकारांपैकी एक होते. उत्तर प्रदेश सरकारचे अतिरिक्त महाधिवक्ता व बाबरी मशीद कार्य समितीचे संयोजक जफरयाब जिलानी यांनी, फारूक यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव मोहम्मद सलाम या प्रकरणी आपल्या पित्याच्या जागी पक्षकार बनू शकतील असे म्हटले आहे. फारुक यांचे वडील मोहम्मद जहूर हे मूळ तक्रारकर्त्यांपैकी एक असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.