बाबासाहेबांचे लंडनमधील घर भारत घेणार ताब्यात
By Admin | Updated: September 16, 2014 03:38 IST2014-09-16T03:19:09+5:302014-09-16T03:38:04+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थिदशेत वास्तव्य असलेले येथील घर महाराष्ट्र सरकारच्या पाठिंब्यामुळे भारताच्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बाबासाहेबांचे लंडनमधील घर भारत घेणार ताब्यात
‘फॅबो’चा पुढाकार : महाराष्ट्राचे 4क् कोटींचे सहकार्य, भारतीय गरीब विद्याथ्र्याची होईल राहण्याची सोय
लंडन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थिदशेत वास्तव्य असलेले येथील घर महाराष्ट्र सरकारच्या पाठिंब्यामुळे भारताच्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 192क् मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना डॉ. आंबेडकर येथील किंग हेन्री रोडवर 2क्5क् चौरस फुटांच्या घरात राहत असत. ही वास्तू सध्या स्मारक बनविण्यात आली आहे. हे घर विकायला काढण्यात आल्यामुळे ते भारताच्या ताब्यात राहावे यासाठी इंग्लंडमधील फेडरेशन ऑफ आंबेडकराईट अँड बुद्धिस्ट ऑर्गनायङोशनने (फॅबो) महाराष्ट्र सरकारने 4क् कोटी रुपये (4 दशलक्ष पौंड) द्यावेत यासाठी पुढाकार घेतला होता.
डॉ. आंबेडकरांच्या वास्तव्याने पावन झालेली ही वास्तू विकत घेण्यासाठी फॅबोला महाराष्ट्र सरकारने सक्रिय पाठिंबा दिल्याबद्दल मी खूप आनंदी आहे, असे फॅबोच्या अध्यक्षा संतोष दास यांनी सोमवारी सांगितले. तथापि, संतोष दास यांनी आम्ही अधिकृत दुजो:याच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले. या वास्तूची एकूण किंमत (जाहिरातीत नमूद केलेली) 3.1 दशलक्ष पौंड असून मुद्रांक शुल्क, कायदेशीर खर्च, वास्तूचा विमा व आवश्यक दुरुस्तीसाठी 2,17,क्क्क् पौंड खर्च करावे लागतील.
भारतातून इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी येणा:या (विशेषत: गरीब कुटुंबातील) विद्याथ्र्याची या वास्तूमुळे राहण्याची सोय होईल. डॉ. आंबेडकरांसारख्या दूरदृष्टीच्या नेत्याचे हे चिरस्थायी स्मारक असेल, असे फॅबोचे सरचिटणीस अरुण कुमार यांनी सांगितले.
तत्पूर्वी, महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी ही वास्तू भारताच्या ताब्यात राहावी यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारबरोबर समन्वयाने काम करावे, अशी सूचना केली होती. या प्रकल्पाला सामाजिक न्याय विभागाने लेखी संमती दिली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही दृष्टिकोन ही वास्तू आपल्या ताब्यात असावी यासाठी सकारात्मक होता, असे नितीन राऊत नागपूरहून बोलताना म्हणाले.
1920 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना
डॉ. आंबेडकर येथील किंग हेन्री रोडवर या 2050 चौरस फुटांच्या घरात राहत असत. ही वास्तू सध्या स्मारक बनविण्यात आली आहे.