विद्यार्थ्यांच्या चौकस स्वभावाला चालना द्या बाबासाहेब पाटील : भेडसगावला विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30

वारणा कापशी : समाजाचे स्वास्थ्य बिघडविणार्‍या अंधश्रद्धा टाळून विज्ञानाला कवटाळण्याची भूमिका समाजात रुजायला हवी, असे मत माजी आमदार बाबासाहेब पाटील (सरूडकर) यांनी व्यक्त केले. भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती पंडितराव नलवडे होते.

Babasaheb Patil: Inauguration of science exhibition at Bhedasgaon | विद्यार्थ्यांच्या चौकस स्वभावाला चालना द्या बाबासाहेब पाटील : भेडसगावला विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

विद्यार्थ्यांच्या चौकस स्वभावाला चालना द्या बाबासाहेब पाटील : भेडसगावला विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

रणा कापशी : समाजाचे स्वास्थ्य बिघडविणार्‍या अंधश्रद्धा टाळून विज्ञानाला कवटाळण्याची भूमिका समाजात रुजायला हवी, असे मत माजी आमदार बाबासाहेब पाटील (सरूडकर) यांनी व्यक्त केले. भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती पंडितराव नलवडे होते.
विठ्ठल गुरव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पाटील म्हणाले, मुलांच्या चौकस स्वभावाला चालना देणे काळाची गरज आहे. यावेळी माजी आमदार विनय कोरे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची गरज आहे. माणसासमोरील आव्हाने पेलण्याचे काम विज्ञान व शास्त्रज्ञ करीत असतात. त्यामुळे देशाच्या प्रगतीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे काळाची गरज आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील, गटशिक्षमाधिकारी एस. बी. भांगरे, पंचायत समिती सभापती पंडितराव नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील माध्यमिक तसेच प्राथमिक शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमास जिल्हा परिशद सदस्या लक्ष्मी पाटील, लतादेवी पाटील, शैक्षणिक विकास मंडळाच्या अध्यक्षा मीरा पाटील, सचिव उदय पाटील, सरपंच रेश्मा फाळके, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. (वार्ताहर)
-------------------
फोटो ओळी : फोटो इमेल केला आहे.
भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार बाबासाहेब पाटील, हंबीरराव पाटील व मान्यवर उपस्थित होते.
---------------------------------

Web Title: Babasaheb Patil: Inauguration of science exhibition at Bhedasgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.