बाबासाहेब

By Admin | Updated: April 13, 2016 00:57 IST2016-04-13T00:57:02+5:302016-04-13T00:57:02+5:30

बाबा आमचा श्वासच

Babasaheb | बाबासाहेब

बाबासाहेब

बा आमचा श्वासच
जगण्याच्या कैदेत धपधपत होता
कालपर्यंत आमची नजर
जमिनीवर चिकटलेली
कापरासारखं भुर्र भुर्र जळणारं मन
भुकेची आठवण आली तऱ़़
ओलं कापड करकचून पोटाला बांधायचो
पिढीजात अर्शूवर्षात भिजायचो़
गावकुसाबाहेरील झिडकारलेलं
आमचं लाचार जीण़ं
ज्वालामुखीलाच गिळावा
असा तेजोमय प्रकाश
बाबा तुमच्या रूपाने राजवाड्याच्या
वस्तीत आला़
शील, करुणा, विद्या, समता, न्याय, बंधुता
याची शिकवण आम्ही समाजाची पाटी
घेऊन गिरवू लागलो़
संविधानाने आमचं जगणं उजळलं
उदात्त, उन्नत दृष्टिकोन ठेवून
तुम्ही आम्हाला माणूस केलंत
आजही आम्ही नित्यनियमाने
तुमच्या पुतळ्याला स्वाभिमानाने
नतमस्तक होऊन हात जोडतो़
- मारुती कटकधोंड
क-429, राजस्व नगर,
विजापूर रोड, सोलापूर
संवाद - 9881124450

Web Title: Babasaheb