बाबा रामदेव यांचा पतंजली समूह बैलांपासून करणार वीजनिर्मिती !
By Admin | Updated: May 15, 2017 16:55 IST2017-05-15T16:55:04+5:302017-05-15T16:55:04+5:30
देशभरात दिवसेंदिवस विस्तार करणा-या बाबा रामदेव यांचा पतंजली समूह सध्या बैलांपासून वीजनिर्मिती करता येऊ शकते का

बाबा रामदेव यांचा पतंजली समूह बैलांपासून करणार वीजनिर्मिती !
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - देशभरात दिवसेंदिवस विस्तार करणा-या बाबा रामदेव यांचा पतंजली समूह सध्या बैलांपासून वीजनिर्मिती करता येऊ शकते का, यावर संशोधन करत आहे. बैलांच्या बळाचा वापर करत वीजनिर्मिती करण्यावर पतंजली समूह गेल्या दीड वर्षांपासून संशोधन करतोय. पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक बालकृष्ण यांच्या कल्पनेवर आधारित असलेल्या प्रयोगाची गेल्या वर्षीच सुरुवात झाली आहे.
या प्रयोगामध्ये देशातल्या एका मुख्य मल्टिनॅशनल मॅन्युफॅक्चरर आणि एका तुर्की कंपनीचाही सहभाग आहे. बैलांचा दिवसभरात शेतात उपयोग होते, तर संध्याकाळी वीजनिर्मितीसाठी वापर करता येऊ शकतो. प्राचीन काळात सामानाच्या दळणवळणासाठी बैलांचा सर्रास वापर केला जात होता. त्याच प्रमाणे तंत्रज्ञानाच्या मदतीने बैलांच्या ताकदीचा वापर केल्यास त्याचा आणखी चांगला उपयोग होऊ शकतो, असेही बालकृष्ण म्हणाले आहेत.
बैलांपासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रयोगासाठी एक प्रोटोटाइप डिझाइन तयार करण्यात आले आहे. बैलांचा वापर केल्यास सध्याच्या घडीला एक टर्बाईन असणाऱ्या डिझाईनमधून जवळपास 2.5 किलव्हॅट वीजनिर्मिती होऊ शकते. हरिद्वारमध्ये पतंजलीच्या प्रयोगशाळेत बैलांपासून वीजनिर्मिती करण्यावर संशोधन सुरू असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. महागडी वीज न परवडणा-या शेतक-यांसाठी बैलांपासून वीजनिर्मिती करण्याची योजना कामी येणार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.