बाबा रामदेव म्हणतात, 'मी निष्पक्ष, निवडणुकीतील निकाल अनपेक्षित'
By Admin | Updated: February 15, 2017 11:41 IST2017-02-15T11:39:27+5:302017-02-15T11:41:04+5:30
योगगुरु बाबा रामदेव यांनी या निवडणुकीत मी निष्पक्ष असल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे भाजपाचा पराभव होईल अशी भविष्यवाणीच करुन टाकली आहे

बाबा रामदेव म्हणतात, 'मी निष्पक्ष, निवडणुकीतील निकाल अनपेक्षित'
>ऑनलाइन लोकमत
डेहराडून, दि. 15 - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नेहमी स्तुतीसुमनं उधळणारे योगगुरु बाबा रामदेव यांनी या निवडणुकीत मी निष्पक्ष असल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे भाजपाचा पराभव होईल अशी भविष्यवाणीच करुन टाकली आहे. 'या निवडणुकीतील निकाल अनपेक्षित असतील. भल्याभल्यांना पराभव पत्करावा लागेल', अशी भविष्यवाणी बाबा रामदेव यांनी केली आहे. उत्तराखंड विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. यावेळी हरिद्वारमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
'या निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ होईल असं सांगताना कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव घेणं मात्र बाबा रामदेव यांनी टाळलं. यावेळी त्यांनी लोकांनी मतदान करण्याचं तसंच ज्यांची नियत चांगली त्यांना मत द्या, असं आवाहन केलं आहे.